bjp party
bjp partysakal

BJP Party : भाजपची चिपळूण जिल्ह्यात राजकीय मशागत सुरू; पाच लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य

आगामी काळातील लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने राजकीय मशागत सुरू केली.

चिपळूण - आगामी काळातील लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने राजकीय मशागत सुरू केली आहे. पक्षाच्या महाजनसंपर्क अभियानातून विविध घटकांचे मेळावे घेण्यासह प्रत्यक्ष भेटीगाठी व चर्चा करण्यावर भर दिला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.

रत्नागिरी जिल्हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यात राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचपैकी दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या; मात्र आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपकडून धडपड सुरू आहे.

bjp party
Pune News : महापालिकेत समाविष्ट गावांमधील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक अद्यापही जिल्हा परिषदेच्या ताब्यात

लोकसभेच्या जागा वाटपात तळकोकणाची जागा कोणाच्या ताब्यात येईल, हे अद्याप निश्चित नाही. भाजपने ग्रामीण भागापर्यंत पक्ष रूजवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. ग्रामपंचायती, विविध सहकारी संस्था ते लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे.

लोकसभेसाठी सुमारे वर्षभर अगोदरपासूनच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पक्षाच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या निमित्ताने निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे.

विधानसभा मतदार संघातील 50 विशेष कुटुंबांची भेटीगाठी, रॅली, समाजमाध्यमातील प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा मेळावा, लाभार्थी, व्यापारी, ज्येष्ठ कार्यकर्ता, संयुक्त मोर्चा, बुद्धिवंतांचे संमेलन, विकासतीर्थ, घरोघरी संपर्क आदींच्या माध्यमातून लोकसभा मतदार संघातील 5 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

bjp party
Ratnagiri News : अ‍ॅपवर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा!

या अभियानांतर्गतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, राजापूर येथे सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची झालेली सभा त्याचाच एक भाग आहे. अशा सभांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकण्यास भाजपने सुरवात केली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपने मागील पाच वर्षात विकासाचे कोणते काम केले? मागणी केलेल्या कामांपैकी किती कामे मंजूर केली? रेल्वेचे, रस्त्यांचे आणि मोठ्या उद्योगांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. या कामासाठी किती विकासनिधी दिला, हे जाहीर करावे. महागाई का वाढली, त्याचे उत्तरही भाजपने द्यावे.

- विनायक राऊत, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com