accident news
accident newssakal

Accident News : कणकवलीत दुचाकी-एसटी धडकेत दोन ठार

मृत हरकुळ बुद्रुकचे; नरडवे रस्त्यावर झाला अपघात

कणकवली : भरधाव दुचाकीची समोरून येणाऱ्या एसटीला धडक बसून हरकुळ बुद्रुक येथील दोघे जागीच ठार झाले. सागर मारुती घाडीगावकर (वय २७, रा. बोंडकवाडी) आणि सुनील सूर्यकांत ठाकूर (४५, रा. काळेतरवाडी) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कणकवली नरडवे रस्त्यावर शिवशक्तीनगर येथे झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, घाडीगावकर आणि ठाकूर दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज दुपारच्या सुमारास ते दोघे घाडीगावकर यांच्याकडे असलेल्या दुचाकी (एमएच ०९ ओइ ९५७०) कणकवलीत आले होते.

सायंकाळी चारच्या सुमारास येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात असताना त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. बराच वेळ हा वाद सुरू होता. यावेळी स्थानिक रिक्षाचालकांनी त्यांना घरी जाण्याची सूचना केली. त्यानंतर ते दोघेही दुचाकीवरून भरधाव वेगात निघाले.

accident news
Kokan Railway : कोकण रेल्वे मार्गावर तीन तासांचा मेगाब्लॉक! मेल-एक्सप्रेस गाड्याना बसणार फटका!

ते शिवशक्ती नगर येथे पोहोचले असता समोरून येणाऱ्या कनेडी ते कणकवली या एसटी (एमएच २० बीएल ३३८०) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. ही बस शिवाजी सत्यवान डोने चालवत होते. त्यांनी आपला वेग कमी करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु मुख्य रस्त्यावर गाडी असल्याने दोन्ही वाहने वेगात धडकली.

मोटारचालक हा मागील व्यक्तीशी बोलत होता, असे एसटी चालकाचे म्हणणे आहे. याच दरम्यान त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात घडला. समोरासमोर जोरदार धडक बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती की, ते दोघे रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडले.

accident news
Bus Accident : मांड नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून एसटी पलटी; चालक-वाहकासह 15 प्रवासी जखमी

दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका चालक संदीप सावंत हे घटनास्थळी पोहोचले. उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले; परंतु ते जागीच मृत झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच हरकुळ बुद्रुकचे सरपंच बंडू ठाकूर, माजी सभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, नित्यानंद चिंदरकर, अनिल कोचरे, गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, समीर ठाकूर, मनीष ठाकूर, हरकुळ पोलिस पाटील संतोष तांबे यांच्यासह अनेक मित्रपरिवार रुग्णालयात दाखल झाले होते.

accident news
Buldhana Bus Accident : दारूने घेतला २५ निष्पापांचा बळी? बुलढाणा अपघातात मोठी अपडेट आली समोर

कणकवली पोलिस सहाय्यक निरीक्षक अनिल हाडळ, पांडुरंग पांढरे आदींच्या पोलिस पथकाने पंचनामा करून दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सागर घाडीगावकर यांच्या मागे आई, विवाहित बहीण तर सुनील ठाकूर यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com