Sindhudurg
Sindhudurg Sakal

Sindhudurg : बीएसएनएलच्या नेटवर्कसह डेटा नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

शासनाच्या संगणकीय प्रणालीच्या सक्तीमुळे ऑफलाईन सेवा देता येत नाही.

Sindhudurg - (ता. दोडामार्ग) गावात बीएसएनएलच्या नेटवर्कसह डेटा नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत संबंधित खात्याचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला.

१४ ऑगस्टपर्यंत फुकेरी येथील टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न केल्यास तसेच झोळंबेतील प्रस्तावित टॉवरबाबत कार्यवाही न केल्यास १५ ऑगस्टला उपोषण छेडू, असा इशारा झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, माजी सरपंच सतीश कामत यांनी निवेदनाद्वारे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिला.

Sindhudurg
Mumbai : मुंबईला जोरदार पावसाने झोडपले; रेल्वे वाहतुक कोलमडली, प्रवाशांचे हाल

निवेदनात म्हटले आहे, की झोळंबे गावात काही दिवसांपासून बीएसएनएलच्या नेटवर्कसह डेटा नेटवर्कचा बोजवारा उडाला आहे. यात ग्राहकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या सेवेमध्ये असलेल्या त्रुटी शोधून सुरळीत मोबाईल नेटवर्कची सुविधा द्यावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.

बीएसएनएलच्या अनागोंदी कारभारामुळे गावात सेवा उपलब्ध असूनही त्या मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शासनाच्या संगणकीय प्रणालीच्या सक्तीमुळे ऑफलाईन सेवा देता येत नाही. त्यामुळे गावातील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. पर्यायाने संबंधितांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Sindhudurg
Mumbai : मुंबईला जोरदार पावसाने झोडपले; रेल्वे वाहतुक कोलमडली, प्रवाशांचे हाल

अधिकाऱ्यांना विचारला जाब
दरम्यान, समस्यांप्रश्नी बीएसएनएलचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, माजी सरपंच सतीश कामत यांनी येथील बीएसएनएलचे जिल्हा कार्यालय गाठून डेप्युटी जनरल मॅनेजर श्री जानू आणि मोबाईल डिपार्टमेंट प्रमुख श्री देशमुख त्यांच्यासमोर विस्कळीत सेवेमुळे सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. याकडे दुर्लक्ष केल्याबाबत जाबही विचारला.

फुकेरी टॉवर पूर्ण क्षमतेने त्वरित कार्यान्वित करण्यासह झोळंबे येथील प्रस्तावित मोबाईल टॉवरबाबत त्वरित कार्यवाही करावी; अन्यथा १५ ऑगस्टला कार्यालयासमोर झोळंबेवासीयांसह उपोषण छेडण्याचा इशारा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com