आजगावात मुलांना जलद वाचनाचे धडे

आजगावात मुलांना जलद वाचनाचे धडे

swt39.jpg
48894
आजगावः वाचन कार्यशाळेत मार्गदर्शक सुभाष शेटगावकर यांच्यासोबत सहभागी विद्यार्थी व समन्वयक विनय सौदागर.

आजगावात मुलांना जलद वाचनाचे धडे
कार्यशाळेस प्रतिसादः वाचनाप्रती रुची वाढण्यासाठी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाड़ी, ता. ३ः जलद आकलन होण्यासाठी मुलांनी पुस्तकांचे वाचन कसे करावे, यासंबंधीची ''वाचन साधना कार्यशाळा'' आजगाव येथे नुकतीच पार पडली. या कार्यक्रमात गोवा येथील सेवानिवृत्त शिक्षक सुभाष शेटगावकर यांनी मान अथवा पुस्तक न हलवता केवळ डोळे फिरवत जलद वाचन कसे करावे, यासंबंधी मुलांना मार्गदर्शन केले. अक्षरबोध, नजर फिरवण्याचा सराव, दृष्टीचा आवाका, शब्दबोध, वाक्यबोध, आकलन आणि अर्थग्रहण असे सात प्रयोग त्यांनी मुलांकडून करून घेतले. मुलांनीही यात चांगली रुची दाखवली.
या कार्यशाळेत २० मुलांनी सहभाग घेतला. ही कार्यशाळा सौदागर कुटुंबीयांनी आपले वडील (कै.) वामन नारायण सौदागर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केली होती. हा त्यांचा चौथा उपक्रम होता. सुमारे दोन तासांच्या या कार्यशाळेची सांगता झाल्यावर मुलांची वाचनाप्रती रुची वाढावी, यासाठी शेटगावकर यांनी दरवर्षीच्या उत्कृष्ट वाचक विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी रोख ५०१ रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
यानंतर पू. गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या मुलांनी दिवाळी अंक वाचून केलेल्या लेखनासाठीची पारितोषिके शेटगावकर यांच्या हस्ते मुलांना प्रदान करण्यात आली. मुलांनी किशोर दिवाळी अंकाविषयी सुरेख लेखन केले होते. यात उल्लेखनीय लेखन-प्रथम रोहित आसोलकर, द्वितीय-खुशी परब, तृतीय-सानिया शेख, विशेष उत्तेजनार्थ-दिया सावंत, उत्तेजनार्थ- मानसी पांचाळ, वैभव पांढरे, संचित पांढरे व विष्णू कळसुलकर यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सर्व दिवाळी अंक माधुरी काकतकर यांच्याकडून, विशेष पारितोषिक बबन आडारकर यांच्याकडून, सर्व उत्तेजनार्थ पारितोषिके अनिता सौदागर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली होती. कार्यशाळेत बक्षीसपात्र विद्यार्थ्यांसोबत हर्षा पांचाळ, तन्वी परब, ऐश्वर्या गावडे, स्वरा मोरजकर, प्रचिती शेटये, वैष्णवी मुळीक, जान्हवी मुळीक, साक्षी सुतार, अथर्व हळदणकर, वेदांत देशमुख, प्रभाकर मोरजकर आणि गंधार गवंडे या मुलांनी भाग घेतला. आभार विनय सौदागर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com