Kokan News
Kokan Newsesakal

लहान मुलांच्या 'या' बाबी कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडवायला ठरतात कारणीभूत!

सध्या प्रचलित उपचारपद्धतीमध्ये या समस्यांवर नेमके आणि परिणामकारक कोणतीही औषधयोजना नाही.
Summary

लहान मुले जशी बोबडी बोलतात ते सर्वप्रथम कोणालाच कळत नाही. काही काळाने त्याच्या आईला त्याचा अर्थ कळतो.

-डॉ. विश्वजित मानकर, चिपळूण

चालणे आणि बोलणे या क्रिया नैसर्गिक (Natural) स्वरूपामध्ये आयुष्यातील ठराविक वयामध्ये सुरू होणे अपेक्षित असते; परंतु या क्रिया काही मुलांमध्ये खूप उशिरा आणि संथगतीने होत असताना दिसतात. इतर लोकांच्या लेखी ही समस्या दुर्लक्षित असते; परंतु स्वतः त्या बालकाची जीवनातील जडणघडण आणि पालकांना आपल्या पाल्याची असणारी चिंता या बाबी त्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडवायला कारणीभूत ठरत असतात.

सध्या प्रचलित उपचारपद्धतीमध्ये या समस्यांवर नेमके आणि परिणामकारक कोणतीही औषधयोजना नाही; परंतु होमिओपॅथी (Homeopathy) शास्त्रामध्ये सदर समस्येसाठी अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक औषधयोजना उपलब्ध आहे. सदर समस्येमागे असणारे कारण होमिओपॅथी शास्त्र खूप निराळ्या प्रकारे अभ्यास करून उपाययोजना करत असते.

Kokan News
Children's Health Tips : नाचू किती नाचू किती : मुलांमधील अति चंचलता

चालणे आणि बोलणे त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रिये या क्रिया सदर अवयवामार्फत करून घेतल्या जातात; परंतु त्याचे मुळ कारण हे मानवी मेंदूमध्ये असणारी केंद्रे उदाहरणार्थ वाचा केंद्र (शरीराचा तोल सांभाळणे यासाठी लहान मेंदूमध्ये असणारे केंद्र.) ही कधी पूर्ण अकार्यक्षम तर कधी कमी क्षमतेने कार्यक्षम असते. होमिओपॅथिक शास्त्रामध्ये औषधे प्रामुख्याने मेंदूमध्ये अशा प्रकारचा असणारा बिघाड यासाठी परिणामकारक असतात. या केंद्रांमधील असणारा बिघाड मुळासह दूर करून ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, हे होमिओपॅथी शास्त्राद्वारे शक्य करत असते.

यामध्ये सुधारणा होत असताना दिसून येणारे सुधारित लक्षणे ही गमतीशिर असतात. रुग्णाच्या मानसशास्त्राचा शास्त्रोक्त विचार करून या सुधारणा होत असताना जे बदल घडतात ते समजून घेऊन सदर रुग्णाच्या पालकांना याची नीट कल्पना देणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे हे गरजेचे असते. उदाहरणार्थ न बोलणारे मूल जेव्हा औषधाच्या परिणामाने बोलण्यास सुरवात करते तेव्हा निरोगी बालकाप्रमाणे प्रथम एका अक्षराचा उच्चार (उदा. बा, पा) अशा प्रकारे होतो. त्यानंतर दोन शब्द आणि नंतर आपले म्हणणे त्याच्या पद्धतीने पूर्ण वाक्यात सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे कसोटी लागते.

कारण, लहान मुले जशी बोबडी बोलतात ते सर्वप्रथम कोणालाच कळत नाही. काही काळाने त्याच्या आईला त्याचा अर्थ कळतो. हळूहळू त्याच्यासोबत नेहमी वावरणाऱ्या कुटुंबीयांना त्याचा अर्थ कळतो. साधारण वयाच्या एका वर्षाच्या आसपास ही प्रक्रिया सुरू होते. आपले म्हणणे कोणालाच न कळणे, हा कालावधी मुलाच्या वयाचा विचार करता त्याच्या प्रतिक्रिया फार तीव्र नसतात; परंतु वाढलेल्या वयात ही प्रक्रिया त्या मुलाला आणि कुटुंबीयांना त्रासदायक ठरत असते.

Kokan News
Business Analytical Mindset : उद्योजकाकडे विश्लेषण क्षमता हवीच!

कारण, वयाचा विचार करता जाणिवा प्रगत झालेल्या असतात आणि आपण जे काही म्हणतो आहे त्याप्रमाणे पुढचा माणूस ऐकत नाही ही त्या रुग्ण बालकाची समस्या असते तर पालकांना त्याचे म्हणणे जाणून घेण्याची इच्छा असूनही सुस्पष्टतेअभावी ते अवघड असते आणि इथे त्या रुग्ण बालकाची चिडचिड सुरू होते. मला हवं ते करत नाही ही जाणीव त्याला त्रासदायक ठरते. अशावेळी प्रामुख्याने रुग्ण बालकाची आई आणि वडील यांचे समुपदेशन करून त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे ठरते. उदा. पूर्ण मुका असणारा मनुष्य काय म्हणतो आहे हे त्याच्या निकटवर्तीयांना त्याचे हातवारे ओठाच्या हालचाली या द्वारे नियमित सरावांनी अवगत होत असतात.

ही प्रकिया पालकांना व्यवस्थित समजावून सांगून त्या रुग्ण बालकावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जावे, अशा प्रकारच्या शिक्षणाची (Education) गरज असते. बालकाच्या विकासामध्ये अशा अनेक बाबी दुर्लक्षित असतात कारण, त्याचा दृश्य स्वरूपात कोणताही परिणाम दिसत नाही किंवा केला जात नाही. उदा. उशिराने येणारे दात, दुधाचे दात पडण्यास होणारा विलंब, दुधाचे दात पडल्यानंतर नवीन येणाऱ्या दातास होणारा विलंब , बालकाच्या डोक्याची टाळू उशिरा भरणे इत्यादी बाबींसाठी होमिओपॅथीमध्ये अत्यंत प्रभावी औषधयोजना आहे. बालकाच्या नैसर्गिक आणि निकोप वाढीमधील येणारे किंवा असणारे अडथळे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा महत्वाचा मुद्दा आहे.

त्याचा सांगोपांग विचार आजच्या लेखामध्ये मुळ विषयासोबत संलग्न असल्याकारणाने आपण करू. लहान मुलांमध्ये मणक्यांची असणारी रचना आणि त्याची नैसर्गिक ठेवण ही एका सरळ रेषेत असते; परंतु काही बालकांमध्ये पाठीच्या कण्याला उजवीकडे किंवा डावीकडे बाक आलेला दिसतो. त्याचप्रमाणे पायाच्या गुडघाखालील हाडाला आणि मांडीच्या हाडाला गोल गाड्यासारखा बाक आलेला दिसतो. केवळ कॅल्शियमची कमतरता असे निदान करून कॅल्शियमपूरक औषधे याचा परिणाम खूपच सीमित आहे.

Kokan News
Konkan Forest : नंदूचे जंगल - 'ते जंगलपण सैराट होऊन या वेड्या परश्यावर प्रेम करू लागले'

गर्भावस्थेच्या काळात मातेमध्ये असणारे कमी कॅल्शियमचे प्रमाण हे बालकाच्या पिंडावस्थेमध्ये जडणघडणीमध्ये कारणीभूत ठरते आणि बालकाला जन्मापासून मृत्यूपर्यंत या कारणाने निर्माण झालेले व्यंग स्वीकारून दुःखद जीवन जगावे लागते. होमिओपॅथी शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या व्यंगासाठी प्रभावी औषधयोजना आहे. या औषधांचा योग्यवेळी वापर केला असता ही व्यंगे मुळापासून नाहीशी झालेली दिसतात आणि रुग्ण बालकाची नैसर्गिक आणि निकोप वाढ होऊ शकते.

यात अन्य शास्त्रांचा सहभाग उपयोगी होतो. फिजिओथेरपी या शास्त्राची इथे मदत घेतल्यास होणारी रोगमुक्ती ही दिशाबद्ध ठरू शकते. उदा. बोलायला सुरवात करताना स्पीच थेरपीद्वारे बदल होण्यास मदत होते. पायातील हाडांमध्ये असणारा बाक आणि पाठीच्या कण्यातील बाक या बाबतीतही काही अंशी सकारात्मक मदत या शास्त्राद्वारे साहाय्यभूत ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com