श्रद्धा, सबुरी विसरलेल्यांवर गद्दारीचा डाग

श्रद्धा, सबुरी विसरलेल्यांवर गद्दारीचा डाग

62781
सावंतवाडी ः येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करताना पदाधिकारी.

श्रद्धा, सबुरी विसरलेल्यांवर गद्दारीचा डाग

उद्धव ठाकरे ः सावंतवाडीतील सभेत आमदार केसरकरांवर टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः खरी शिवसेना कोणाची हे जनतेला माहीत आहे; परंतु आठवड्यातून एकदा शिर्डीला जाणारे सत्तेच्या खूर्चीसाठी पक्षावरची श्रद्धा आणि सबुरी विसरतात. अशा व्यक्तिवर लागलेला गद्दारीचा टिळा ते आयुष्यभर पुसू शकणार नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता केली. ते आज येथे आयोजित शिवसेना संवाद यात्रेत बोलत होते.
या राज्यातील मोदीची पिलावळ ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडत आहे. त्यामुळे आम्हाला देशातील पाशवी बहुमताचे हुकूमशाही सरकार नको. आम्हाला इंडिया आघाडीचे मिलीजुली सरकार चालेल; मात्र जेव्हा आमचे दिवस येतील, तेव्हा व्याजासह परतफेड होईल, असा इशाराही श्री. ठाकरे यांनी यावेळी दिला.
शहरातील गांधी चौकात श्री. ठाकरे यांची संवाद यात्रा पार पडली. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश कोरगावकर, दत्ता दळवी, गौरीशंकर खोत, अरुण दुधवडकर, शैलेश परब, वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, सतीश सावंत, संजय पडते, बाबुराव धुरी, रुपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, मंदार शिरसाठ, सुशांत नाईक, बाळा गावडे, मायकल डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘खरी शिवसेना कोणाची आहे हे जनतेला माहीतच आहे. मी येथे माझ्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. इथल्या एका डबल गद्दार माणसाला एका अपेक्षेने पक्षात घेतले होते. ते आठवड्यातून शिर्डीला जातात, म्हटले देवाधर्माचा माणूस आहे; परंतु त्यांनी सत्तेसाठी केलेली गद्दारी आणि त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा टिळा ते कधीच आयुष्यात पुसू शकणार नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये सावंतवाडीसह सिंधुदुर्गातील एका मतदारसंघात राहिलेली घाणही तुम्ही साफ करून टाका. मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कोकणच्या विकासाचे काम केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याचवेळी एका खासगी मेडिकल कॉलेजलाही परवानगी दिली. नौदल दिन प्रथमच कोकणात झाला. यावेळी पंतप्रधान कोकणाला भरभरून देऊन जातील, अशी अपेक्षा होती; मात्र त्यांनी कोकणाला काहीच दिले नाही; परंतु या ठिकाणी मंजूर असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन ‘होऊन जाऊ दे, चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेऊन हुकूमशाही सरकारच्या योजनांची पोलखोल करा.’’ खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव, सतीश सावंत, गौरीशंकर खोत, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी यांनीही मार्गदर्शन केले.
---------------
चौकट
रुपेश राऊळ यांच्याकडून स्वागत
श्री. ठाकरे यांची संवाद यात्रा होत असल्याने अख्खे शहर भगवेमय झाले होते. भर दुपारी ही सभा असतानाही विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने शिवसैनिक सावंतवाडीत दाखल झाले होते. कडाक्याच्या उन्हातही एकही शिवसैनिक शेवटपर्यंत जागेवरून हलला नाही. श्री. ठाकेर शहरात दाखल होताच तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्यासमोर पुष्पहार अर्पण करून त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com