Railway News
Railway News esakal

Railway News: ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये सूट द्यावी!

All Maharashtra Primary Teachers Union Sindhudurg District President Raja Kavitkar and District General Secretary Babaji Zende have appealed to take advantage of the practice test.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात गरीब महिला, युवा शेतकरी यांच्यासाठी भरीव मदतीची तरतूद करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र, कोरोना काळापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये सूट दिली जायची. त्यासाठी १८०० कोटी रुपये खर्च केले जायचे. कोरोना काळापासून ही सूट बंद केली आहे. ती सूट मिळावी, अशी प्रतिक्रिया येथील ज्येष्ठ व्यापारी अशोक ठोंबरे यांनी व्यक्त केली.

Railway News
Railway News: पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने बनावट भरतीचे रॅकेट केले उद्ध्वस्त!

शिष्यवृत्ती सराव परीक्षा शुक्रवारपासून


ओरोसः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या वतीने घेतली जाणारी पाचवीसाठी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड अंतर्गतची शिष्यवृत्ती सराव परीक्षा ९ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत २०० जिल्ह्यांतील १४४ केंद्रांवर घेतली जाणार आहे. विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना कोल्हापूरमधील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मागदर्शन वर्ग घेण्यात आला.

यामध्ये प्रकाश पाटील, सुनील कुदळे आणि संदीप वाली यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तालुकानिहाय परीक्षा केंद्रांचे नियोजन, वेळापत्रक व बैठक व्यवस्था सर्व शाळांना परीक्षेपूर्वी दोन दिवस कळविली जाणार आहे. अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटनेतील शिष्यवृत्ती तज्ज्ञ शिक्षक याचे नियोजन करीत असून, गोपनीय पद्धतीने शासकीय नियमानुसार कामकाज केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील टॉप टेन जाहीर करून त्यांना गौरविण्यात येणार आहे. सराव परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजा कविटकर व जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे यांनी केले आहे.

Railway News
Jalgaon Railway News: भुसावळ रेल्वेने जानेवारीत मिळविला 131 कोटींचा महसूल

काजू उत्पादकांची वैभववाडीत सभा


वैभववाडीः तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांची सभा ७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सिंधू ग्रो कंपनी वैभववाडी येथे आयोजित केली आहे. या बैठकीस शेतकरी नेते विलास सावंत मार्गदर्शन करणार आहेत. काजू बी ला २०० रुपये हमीभाव मिळावा, यासाठी वैभववाडी तालुका तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

त्यांचे नियोजन या सभेत करण्यात येणार आहे. काजू बी ला २०० रुपये हमीभाव मिळावा, यासाठी काजू परिषद कोल्हापूर येथे घेण्यात आली होती. या परिषदेत एकमताने काजू बी ला २०० रुपये हमीभाव मिळावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. यासाठी प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलन करून काजू उत्पादक शेतकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे ठरविण्यात आले. तालुक्यातील सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित राहून एकजूट दाखवून २०० रुपये हमीभाव मिळविण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राजू पवार यांनी केले आहे.

Railway News
Railway News: आता कल्पवृक्षातून मध्यरेल्वे कमवणार महसूल; जाणून घ्या रेल्वेची भन्नाट कल्पना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com