Deepak Kesarkar vs Vinayak Raut
Deepak Kesarkar vs Vinayak Rautesakal

खाल्ल्या ताटात घाण करायची केसरकारांनी दाखवलेली वृत्ती दुर्दैवी आहे; खासदार राऊतांचा जोरदार निशाणा

दीपक केसरकर मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी दिले, असे खोटे आरोप करीत आहेत.
Summary

'ज्यांनी तुम्हाला खरे राजकीय वैभव प्राप्त करून दिले, त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करत असाल तर आम्हालाही सावंतवाडीच्या गांधी चौकात तुमचा पंचनामा करावा लागेल.'

सावंतवाडी : आर्थिक स्थिती खालावल्याचे सांगून २०१९ च्या विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्याकडून परतफेडीवर घेतलेला पक्षनिधी चेकद्वारे परत केल्यावर त्याचे भांडवल करून दीपक केसरकर मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी दिले, असे खोटे आरोप करीत आहेत. पक्षाने दिलेली बरीच रक्कम अजून येणे बाकी असून त्यावर आता पाणी सोडले; मात्र त्यांनी उगाच खोटे आरोप केल्यास आम्हालाही सावंतवाडीच्या गांधी चौकात त्यांचा उघड पंचनामा करावा लागेल, असा इशारा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

सावंतवाडी मतदारसंघात २०१४ मध्ये शैलेश परब यांनी केलेले काम पाहून घाबरून शिवसेनेत उडी घेत तिकीट मिळविलेल्या केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद दिले, पालकमंत्री केले; परंतु, खाल्ल्या ताटात घाण करायची केसरकारांनी दाखवलेली वृत्ती दुर्दैवी आहे, असेही राऊत म्हणाले.

Deepak Kesarkar vs Vinayak Raut
RSS, भाजपचा पराभव करणे हीच गोविंद पानसरेंना खरी श्रद्धांजली ठरेल; 'कम्युनिस्ट'च्या सरचिटणीसांचा निशाणा

ते म्हणाले, ‘‘नेहमी साईबाबांचा जप करणाऱ्या केसरकर (Deepak Kesarkar) यांनी श्री. ठाकरेंवर केलेले खोटे आरोप साईबाबांच्या भक्तांना व खुद्द साईबाबांना तरी आवडेल का, याचा विचार त्यांनी करावा. भर उन्हात सावंतवाडीच्या गांधी चौकात ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. सभेची गर्दी पाहून बिथरलेले केसरकर खोटारडे आरोप करत आहेत. मुळात शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना श्री. ठाकरे यांनी मंत्री केले. सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दिले. परंतु, असे असतानाही ज्या ताटात खायचे, त्याच ताटात घाण करायची ही वृत्ती त्यांनी दाखवली. माझ्या खासदारकीच्या निवडणुकीतही त्यांनी मला मदत केली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो आणि याआधीही मानले आहेत.

परंतु, माझ्या त्या संपूर्ण खासदारकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये ते कधीच सहभागी झाले नाहीत. त्यांनी गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून प्रेस नोट देण्यापलीकडे थेट पत्रकार परिषद किंवा प्रचारामध्ये स्वतःची बाजू कधीच मांडली नाही. त्यांनी केलेले उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. त्या वेळी मला पाठिंबा देताना गोव्याच्या हॉटेलमध्ये जे काही बोलणं आणि देणं-घेणं झालं हे आता बोलणार नाही; परंतु, त्यांनी आपण कोणतरी खूप मोठे सज्जन आहोत, असा आव आणू नये.’

ते म्हणाले, ‘‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आर्थिक स्थिती खालावल्याचे सांगून श्री. ठाकरे यांच्याकडे परतफेडीवर पक्षनिधी मागितल्यानंतर कुठलाही विचार न करता मंत्री असतानाही केसरकर यांना पक्षाने निधी दिला. तो किती दिला, हे मी सांगणार नाही; परंतु, तो नाही दिला, असे त्यांनी साईबाबांची शपथ घेऊन सांगावे. केसरकर यांनी दिलेल्या रकमेपैकी काही अंशी रक्कम पक्षाकडे परत केली आहे. अजूनही बरीचशी रक्कम बाकी आहे; परंतु, आम्ही त्यावर पाणी सोडले. त्यांनी जेवढे पचेल तेवढे खावे. मात्र, आज त्यांनी जी रक्कम परत केली, त्याचे भांडवल करून ते मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये ठाकरे यांना दिले असे खोटे आरोप करत आहेत.

Deepak Kesarkar vs Vinayak Raut
Konkan Business : सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं सोंग घेता येत नाही.!

ज्यांनी तुम्हाला खरे राजकीय वैभव प्राप्त करून दिले, त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करत असाल तर आम्हालाही सावंतवाडीच्या गांधी चौकात तुमचा पंचनामा करावा लागेल. मुळात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारात आम्ही घडलो आहोत. त्यामुळे तोंड सोडून वाटेल तशी बदनामी करणार नाही. मात्र, राजकीय दहशतवादाचा बागुलबुवा करत खासदारकीच्या निवडणुकीत गोव्याच्या हॉटेलमध्ये झालेली लेन देन आणि अन्य गोष्टी आम्हाला बाहेर काढाव्या लागतील.’’ यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पडते, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, मंदार शिरसाट, शिवदत्त घोगळे, हिमांशू परब, सुनील गावडे, आबा सावंत उपस्थित होते.

Deepak Kesarkar vs Vinayak Raut
पट्टा की दांडपट्टा? तज्ज्ञांकडून स्पष्टतेचा आग्रह; शासनाने 'दांडपट्टा' शस्त्राला दिला राज्यशस्त्राचा दर्जा

मी घाबरणार नाही!

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्यासमोर कोण उमेदवार आहे, हे पाहून मी घाबरणारा नाही. मी पैशाने कमी असेन; परंतु, आमच्याकडे जनतेचा पाठिंबा आहे. नारायण राणे इच्छुक असल्यास त्यांनीही निवडणुकीत उतरावे आणि पराभूत व्हावे. दुसरीकडे किरण सामंत यांनीही माझ्यासमोर उभे राहावे. त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असेही खासदार राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com