विकास संस्थांना जिल्हा केडरमार्फत सचिव

विकास संस्थांना जिल्हा केडरमार्फत सचिव
Published on

68902
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मनीष दळवींची निवड झाली.

विकास संस्थांना जिल्हा केडरमार्फत सचिव

मनिष दळवी ः शासनाकडून राजपत्रात सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः जिल्ह्यातील विकास संस्थांचे काम गतिशील होण्यासाठी पूर्वीप्रमाणे जिल्हा देखरेख संस्थेमार्फत सचिव उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाने २९ फेब्रुवारी २०२० च्या राजपत्रात सुधारणा केल्या आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व विकास संस्थांना जिल्हा केडरमार्फत सचिव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
महाराष्ट्र अधिनियम १९६० चे कलम ६९ मध्ये सुधारणा करून पूर्वीप्रमाणे सचिव नेमणुकीसाठी शासनाने मान्यता द्यावी, यासाठी सिंधुदुर्ग व इतर सहकारी बँकांनी राज्याकडे सातत्याने मागणी केली होती. या मागणीचा विचार करून शासनाने २९ फेब्रुवारी २०२० च्या राजपत्रात सुधारणा केल्याचे श्री.दळवी यांनी सांगितले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा देखरेख सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी यांची निवड झाली आहे. नुतन संचालक म्हणून सर्वश्री कमलाकांत कुबल, संजय गवस, मधुकर देसाई, कमलेश गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, नंदकिशोर सावंत, समाधान जाधव, सदानंद जेठे, श्रीमती नूतन मांजरेकर, सुभाष बोवलेकर, अंबाजी हुंबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांनी काम पाहिले. श्री. दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा १ मार्च २०२४ ला झाली. या सभेत नूतन सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे श्री. दळवी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com