आश्वासनामुळे भगवान कोकरे यांचे उपोषण स्थगित

आश्वासनामुळे भगवान कोकरे यांचे उपोषण स्थगित
Published on

rat3p40.jpg-
68891
चिपळूणः विश्वनाथ वारिंगे, प्रल्हाद शास्त्री यांच्या हस्ते दूध पिऊन भगवान कोकरे यांनी उपोषण स्थगित केले.
---------
भगवान कोकरेंचे उपोषण
अकरा दिवसांनी स्थगित
पशुसंवर्धन विभागाने दिले पत्र; १५ दिवसात न्याय देण्याचे आश्वासन
चिपळूण, ता. ३: पशुसंवर्धन विभागाने दिलेले पत्र व खासदार श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले यांनी केलेली मध्यस्थी यामुळे गेल्या ११ दिवसांपासून भगवान कोकरे यांनी पुकारलेले उपोषण रविवारी स्थगित केले.
खेड तालुक्यातील लोटे येथे हे उपोषण सुरू होते. दिलेल्या आश्वासनाची १५ दिवसात पूर्तता न केल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा कोकरे यांनी दिला आहे. राज्यातील गोशाळांमध्ये असलेल्या गाईला शासनाने केवळ चारा द्यावा या प्रमुख मागणीसह लोटे गोशाळेचे रखडलेले २५ लाख रूपयांचे अनुदान शासनाने तातडीने द्यावे, वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा, जागेचा प्रश्न सोडवावा या मागण्यांसाठी कोकरे यांनी हे उपोषण पुकारले होते. इतके दिवस शासनाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र रविवारी खेड पशुसंवर्धन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय देशमुख, धामणदेवीचे तलाठी दिलीप तांबे व पोलिस अधिकाऱ्यांनी कोकरे यांची भेट घेतली. यावेळी पशुसंवर्धन विभागाने ज्या मागण्या त्यांच्या अखत्यारित आहेत, त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच वारकरी सांप्रदाय कोकण विभागाचे अध्यक्ष विश्वनाथ वारिंगे, आखाडा परिषदेचे प्रल्हाद शास्त्री, अंबरनाथमधील उद्योजक शिवाजी इरमाळी यांनीही रविवारी कोकरे यांची भेट घेतली. वारिगे यांनी खासदार शिंदे व आमदार गोगावले यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून १५ दिवसात न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही कोकरे यांना उपोषण स्थगित करण्यास सांगितले.

चौकट
गाईंनी घातला गराडा
कोकरे यांनी उपोषण सोडताच परिसरात फिरणाऱ्या गाईंना वंदन केले. यावेळी शेकडो गाईंनी त्यांना गराडा घालताच कोकरे यांना अश्रू अनावर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com