vinayak raut
vinayak rautsakal

MP Vinayak Raut : प्रत्येक मिनिट जगलो मतदारांसाठी

प्रत्येक मिनिट मतदारांसाठी जगलो याचे खासदार म्हणून समाधान आणि अभिमान आहे.

रत्नागिरी - संसदीय आयुध वापरून केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा १०० टक्के प्रयत्न केला. लोकसभेत एकूण ४६९ प्रश्न विचारले. लोकसभेमध्ये वेगवेगळ्या चर्चेत १०८ वेळा सहभागी झालो. लांजा तालुक्यातील माचाळच्या रस्त्याचा प्रश्न सोडविला.

प्रत्येक मिनिट मतदारांसाठी जगलो याचे खासदार म्हणून समाधान आणि अभिमान आहे. देशात रखडलेल्या महामार्गामध्ये पहिला क्रमांक मुंबई-गोवा महामार्गचा आहे. नितीन गडकरी यांनी प्रयत्न करूनही तो मार्गी लागला नाही, ही एक दुःखद बाब आहे, अशी भावना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत लोखाजोखा २०१९ ते २०२४ या त्यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, लोकसभेच्या कार्यकाळात गेली पाचही वर्षे प्रत्येक मिनिट मतदारांसाठी जगलो आणि मतदारसंघात विकास होण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याचाच निवडक लेखाजोखा आपल्यासमोर सादर केला. मतदारांसमोर माझी कामगिरी सादर करताना ताठ मानेने, त्यांना अभिमान वाटेल असा लेखाजोखा मांडतो आहे.

कोविडच्या महाभयंकर लाटेत दोन वर्षे संसदेचे कामकाज फारसे झाले नाही तरी उरलेल्या कार्यकाळात सरासरी उपस्थिती ७३ टक्के इतकी राहिली, २०२२ च्या पावसाळी अधिवेशनात कोरोनाची लागण झाल्यामुळे एकही दिवस उपस्थित राहता आले नव्हते. सातत्याने कामकाजामध्ये पूर्ण वेळ सहभागी झालो, असे त्यांनी सांगितले.

केलेली ठळक कामे...

संसदेव्यतिरिक्त कोकण रेल्वे, बीएसएनएलचे गावागावातील टॉवर्स, ओरोस येथील वैद्यकीय महाविद्यालय, रिफायनरी विरुद्धचा लढा, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाल्यानंतरही दुर्लक्षित राहिलेल्या माचाळ आणि उंबरवणेवाडी येथे रस्ता करून त्याच्या विकासाचा केलेला यशस्वी प्रयत्न, निसर्ग वादळाच्या काळातील मदत, त्याचप्रमाणे चिपळूण महापुरानंतर तेथे केलेले काम यावर लेखाजोख्यामध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com