Eknath Shinde
Eknath Shindeesakal

Mandangad MIDC : मंडणगडात उभारण्यात येणार 850 एकर क्षेत्रात एमआयडीसी; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

येत्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) आपल्याला पंतप्रधान मोदींचे हात बळकट करावयाचे आहेत.
Summary

रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल त्याला आपल्याला निवडून द्यावयाचे आहे.

दाभोळ : मंडणगड (Mandangad) तालुक्यात ८५० एकर क्षेत्रात एमआयडीसी उभारण्यात येईल तसेच मंडणगड येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दापोली येथे शिवसेनेच्या मेळाव्यात केली. आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ही मागणी केली होती.

Eknath Shinde
गोव्याचा मुख्यमंत्री इथं येऊन शिवसेनेच्या जागेवर हक्क गाजवतोय, तुमचं चाललंय काय? रामदास कदमांचं भाजपवर टीकास्र

मुख्यमंत्री शिंदे दापोली (Dapoli) तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी आले असताना आझाद मैदान येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) आपल्याला पंतप्रधान मोदींचे हात बळकट करावयाचे असून महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून द्यावयाचे आहेत.

त्यासाठी रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल त्याला आपल्याला निवडून द्यावयाचे आहे. सध्या केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार आहे. राज्याच्या विकासाचे जे प्रस्ताव आपण केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवतो त्यासाठी निधी देताना केंद्र सरकार हात आखडता घेत नाही. आपण स्वतःला कॉमन मॅन समजतो तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री मानतो.

Eknath Shinde
Barsu Refinery Project : रिफायनरीसह धनिकांच्या साम्राज्याला आमचा विरोध, अध्यादेशाची करणार होळी; खासदार राऊतांचा इशारा

कोणीही आपल्यावर आरोप केले तरी त्याला आरोपाने उत्तर न देता आपण विकासाच्या माध्यमातून या टीकेला उत्तर देत असतो. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर मुंबई सिंधुदुर्ग असा ग्रीन फिल्ड महामार्गासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

फूड प्रोसेसिंग युनिट

हर्णै येथील २०० एकर शासकीय जागेत फूड प्रोसेसिंग युनिटसारखे प्रकल्प उभारण्यात येतील. माजी मंत्री रामदास कदम यांनी सुचविल्याप्रमाणे कोयनेचे वाहून जाणारे ६५ टीएमसी पाणी उपयोगात आणण्यासाठी बंधारे बांधण्यात येतील व हे काम प्राधिकरणातर्फे करण्यात येइल.

Eknath Shinde
Barti Center : 'बार्टी'च्या स्पर्धा परीक्षा केंद्रांना टाळे? घोषणा 365 कोटींच्या निधीची; मंजूर फक्त 75 कोटी रुपये

इमारतीचे भूमिपूजन

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दापोली शहरातील काळकाई कोंड येथील दापोलीची ग्रामदेवता श्री काळकाई मंदिर परिसराच्या सुशोभीकरण भूमिपूजन, दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ५० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com