भाजप-ठाकरे गट कार्यकर्त्यांत
रस्ता मंजुरीवरून श्रेयवाद

भाजप-ठाकरे गट कार्यकर्त्यांत रस्ता मंजुरीवरून श्रेयवाद

भाजप-ठाकरे गट कार्यकर्त्यांत
रस्ता मंजुरीवरून श्रेयवाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः तालुक्यातील रांगणा तुळसुली भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्ता मंजुरीच्या श्रेयावरून श्रेयवाद रंगला. हा प्रकार रांगणा तुळसुली येथे घडला. रांगणा तुळसुलीतील रस्त्याच्या भूमिपूजनासाठी भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्रित आले होते. भूमिपूजनासाठी लावलेला ठाकरे शिवसेनेचा फलक बाजूला केल्याने घटनास्थळावरील वातावरण तंग झाले.
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शाब्दिक फैऱ्या झढल्या. कार्यकर्त्यांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे परिसरातील वातावरण तप्त झाले. उपस्थित पोलिसाने कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते आपल्या गाडीत बसले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे गाडीत बसलेले कार्यकर्ते पुन्हा खाली उतरले आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे पुन्हा वातावरण तंग झाले. गावातील रस्त्याच्या भूमिपूजनावरून मात्र चांगलाचा राजकीय गोंधळ उडालेला दिसून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com