कोकणातले रहस्यमय कोळसुंदे

कोकणातले रहस्यमय कोळसुंदे

३५ (सदर पान ६ वा २)
---------

(४ मार्च टुडे ३)


रानभूल-लोगो

rat२३p१४.jpg ः
P२४M७२९९८
प्रतीक मोरे


इंट्रो

दरवर्षी उन्ह्याळ्याच्या दिवसात कोसुंब, कोळंबे, डिंगणी, राई भातगाव अशा गावांमध्ये दरवर्षी रानकुत्र्यांचे कळप काही दिवसांसाठी नेहमी आढळून येतात तसेच लांजा, राजापूर तालुक्यातसुद्धा अनेक गावांमध्ये हे कळप फिरत आहेत, असं प्रत्यक्षदर्शीच म्हणणं आहे. काही रेल्वे ट्रॅकमन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कदाचित हे कळप रेल्वेरूळांचा आणि पुलांचा भ्रमणमार्ग म्हणून उपयोग करत असावेत, अशी शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी वन्यअभ्यासकांना फणसाड अभयारण्यामध्ये सुद्धा रानकुत्रे आणि त्यांचे कळप वावरत असल्याचे पुरावे आढळले आहेत. आरवली भागात मागच्याच आठवड्यात एक मेलेला रानकुत्रा दिसून आला होता. गुहागरमधील नुकतीच घडलेली घटना पाहिली तर आता हे कळप समुद्रकिनारी भागात पोचले असावेत, असा अंदाज आहे.

- प्रतीक मोरे, देवरूख
Email ID: moreprateik@gmail.com
-------
कोकणातले रहस्यमय कोळसुंदे

गेली काही वर्षे आम्ही लावत असलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वेळोवेळी अनेक प्राणी मिळाले आहेत. शार्दुल केळकर आणि आमची सह्याद्री निसर्गमित्रची टीम खवलेमांजर संरक्षण प्रोजेक्टसाठी फिरत असताना आणि गावोगावी भेट देत असताना अनेकदा लोकांकडून कोळशिंदे प्राण्यांचे किस्से ऐकायला मिळायचे. सह्याद्री पर्वतरांगेजवळची गावं सुरवातीला या कहाण्यांची केंद्रस्थाने होती; परंतु नंतर अगदी देवरूख -संगमेश्वर रस्त्यावरची गावं, खाडीपट्ट्यामधली गावं इथे सुद्धा या गोष्टी कानावर पडू लागल्या. डॉ. शार्दुल रात्री प्रवास करून येत असताना एकदा साखरपा-लांजा रस्त्यावर गाडीखाली येऊन मेलेल्या एका रानकुत्र्याचे मृत शरीरसुद्धा सापडले. यानंतर आम्ही ज्या गावांमध्ये वेळोवेळी अशा कळप दिसल्याच्या घटना घडतात तिथे जाऊन चौकशी केली आणि अशा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे सेट केले. त्यात आम्हाला काही कळप मिळाले. हे कळप ६ ते ७ कुत्र्यांचे होते आणि त्यात पिल्ले पण होती. एका गावामध्ये तर जवळजवळ वर्षभर कॅमेरा लावायचा निर्णय आमच्या टीमने घेतला आणि तो योग्यही ठरला. कारण, शेळी,मेंढीपालन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या गावात आम्हाला जवळजवळ वर्षभर यांचे अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. इथल्या गावकऱ्यांशी बोललो असता त्यांचे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरवातीला वास्तव्य होते; परंतु व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यांचे वस्तीच्या ठिकाणी पुनर्वसन झालं आणि त्यांच्या शेळ्या-मेंढ्यापाठोपाठ रानकुत्रेपण वस्तीकडे दाखल झाले असावेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावर अधिक अभ्यास होण गरजेचं असल्यामुळे सध्या याकडे एक स्थलांतर थेअरी म्हणून पाहायला हरकत नाही.
या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचं सुद्धा प्रकर्षाने चर्चेतून जाणवतं. उदाहरणार्थ, हे रानकुत्रे आपले मूत्र भक्ष्याच्या डोळ्यात उडवून त्यांना आंधळे करतात. आपल्या शेपटीच्या गोंड्याने हे मूत्र उडवतात आणि हे प्राणी अत्यंत क्रूर असतात वगैरे; परंतु या गोष्टींमध्ये तथ्य दिसून येत नाही. काहीवेळेला जिवंत शिकारीचे लचके तोडल्याचे व्हिडिओसुद्धा इंटरनेटवर उपलब्ध असले तरी यांनी माणसावर केलेल्या हल्ल्यांची उदाहरणे जवळजवळ शून्य आहेत. त्यामुळे या प्राण्यांपासून भिती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही.
या प्राण्यांविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि त्यातील बऱ्याच गोष्टीमध्ये तथ्य आढळून येते जसे की, हा प्राणी मुख्यतः कळपात (झुंडीने) राहून शिकार करतो आणि याच्या आकारमानाच्या जवळपास ३-४ पटीने मोठ्या असलेल्या भक्ष्याला हा मारू शकतो. हा वाघ, बिबट्यांपेक्षाही शिकार पकडण्यामध्ये जास्तवेळा यशस्वी होतो. याचा दरारा असा की, जंगलामध्ये जर वाघ याच्यासमोर आला तर वाघसुद्धा स्वतःचा रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने जाणं पसंत करतो; पण याच्या नादाला लागत नाही.
आकारमानाने आपल्या कुत्र्याएवढा असणारा हा प्राणी शरीरावरील तांबूस रंग आणि काळ्या रंगाची झुपकेदार शेपटी या ठळक वैशिष्ट्यांमुळे लगेच ओळखून येतो. साधारणतः १५-१८ किलोग्रॅमपर्यंत ढोलचे वजन भरते. जंगली कुत्रा हा ५-१२ सदस्यांना घेऊन कळपाने राहणे पसंत करतो. यामध्ये नरांची संख्या मादीच्या मानाने जास्त असते. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणारा विणीचा हंगाम जानेवारीपर्यंत संपतो. ढोलची मादी ६०-६३ दिवसांनी सरासरी ५-६ पिल्लं जन्माला घालते. ढोलचा अधिवास जंगल जरी असलं तरी त्यांना या जंगलात एक विशिष्ट जागा हवी असते. विशिष्ट रचनात्मक पद्धतीने ढोल जमिनीमध्ये खड्डा करून भुयार बनवतात. ढोल हा सामाजिक प्राणी आहे. शिकार करण्यापासून ते जन्माला आलेल्या पिल्लांची काळजी घेण्यापर्यंत सर्व काही ते कळपाने करतात. आकाराने कुत्र्याएवढा असणारा हा प्राणी शिकार मात्र त्याच्यापेक्षा २-३ पट मोठ्या असलेल्या प्राण्यांची करतो. सांबर, डुक्कर, चितळ, भेकर (barking deer), पिसोरी (mouse deer) अशा प्राण्यांना शिकारीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून मारतो.
शिकारी साखळीमध्ये अगदी उच्चस्थानी असणारे हे ढोल तृणभक्षी प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचं महत्वपूर्ण काम करत असल्यामुळे त्यांचं संवर्धन आणि संरक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणेही या प्राण्यांना संरक्षण प्राप्त आहे. IUCN या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वाघाला ज्या endangered category मध्ये ठेवले आहे त्याच category मध्ये ढोल आहे. आपल्या कोकणातदेखील आधीपेक्षा ढोलची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जर वेळीच आपण ढोल प्राण्याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काही वर्षांत चित्त्याप्रमाणे आपल्या भारतातून ढोल कधी नामशेष होईल, हे कळणार सुद्धा नाही.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com