Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

Deepak Kesarkar : मंत्री दीपक केसरकरांसह 13 जणांना बंदुका जमा करण्याचे आदेश

१३ शस्त्रधारकांना नोटिसा काढल्या असल्या तरी जवळपास २४५ परवानाधारक बंदुका आहेत.
Summary

शेतकरी संघटनेचे नेते वसंत सीताराम केसरकर यांना देखील नोटीस बजावली असून ते स्वातंत्र्यसैनिक आहेत.

सावंतवाडी : तालुक्यात २४५ पैकी केवळ १३ परवानाधारकांना बंदुका (Gun) पोलिस ठाण्यात (Sawantwadi Police) जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. त्यात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हाधिकारी तावडे यांनी या तेराजणांना काढलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, जामिनावर मुक्तता झालेल्या व्यक्ती, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आणि कोणत्याही वेळी पण खास करून निवडणूक कालावधीमध्ये दंगलीत समावेश असलेल्या व्यक्तींना शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करून घेणे आवश्यक आहे.

Deepak Kesarkar
Kolhapur Lok Sabha : 'कौन है यह मुन्ना, कहाँसे आया..' शरद पवारांच्या एका वाक्यावरच फिरली 2004 ची निवडणूक

तालुक्यातील १३ शस्त्रधारकांना नोटिसा काढल्या असल्या तरी जवळपास २४५ परवानाधारक बंदुका आहेत. मात्र, यातील १३ जणांचे नाव असल्याने व त्यात मंत्री केसरकर यांचेही नाव असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आत्मसंरक्षण शस्त्रपरवाना असलेल्या या परवानधारकांना दिलेल्या नोटिसीतील कारणांमध्ये केसरकर कुठे बसतात?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Deepak Kesarkar
Sangli Loksabha: सांगलीत शिवसेना जिंकली, हरली पण वाढली नाही; 'मातोश्री'वरूनही मिळालं नाही बळ?

शेतकरी संघटनेचे नेते वसंत सीताराम केसरकर यांना देखील नोटीस बजावली असून ते स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘मला बजावण्यात आलेली नोटीस चुकीच्या पद्धतीची आहे. कोणत्याही न्यायालयात किंवा कोठेही प्रकरण प्रलंबित नाही. तसेच जामीनावर मुक्त नसताना नोटीस कशी बजावण्यात आली? याबाबत मी तत्काळ उलट टपाली जाब विचारणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com