Chiplun Taluka
Chiplun Talukasakal

Konkan News: 21 महिन्यांनी का होईना पण बळीराजाच्या पदरात पडले अनुदान

चिपळूण तालुका ; ५६ गावांतील ४३५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई|Chiplun Taluka; Compensation to 435 affected farmers in 56 villages

Chiplun News: गेल्या पावणेदोन वर्षापासून रखडलेल्या भातशेती नुकसानीचे अनुदान २१ महिन्यानंतर शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. चिपळूण तालुक्यातील ५६ गावातील ४३५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या भरपाईचा लाभ मिळणार आहे.

जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील खाडीपट्ट्यातील भिले, ग्रांग्रई, कालुस्तेसह असंख्य गावांत भातशेतीचे नुकसान झाले. दीर्घकाळ पाणी साचून राहिल्याने शेती काही ठिकाणी कुजून गेली होती.

या शेती नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले होते. नुकसान भरपाईबाबत शासनस्तरावरून मदतीच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात मदतीचा पत्ताच नव्हता. अखेर तब्बल २१ महिन्यांनंतर २०२२ मधील शेती नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा होऊ लागले आहे.

तालुक्यातील एकूण ५६ गावांतील ४३५ शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले असून, त्याची यादी तहसील कार्यालयाकडून कृषी विभागाकडे पाठवण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत पातळीवर पाठवण्याचे काम सुरू आहे.

यापूर्वी नुकसानीच्या पंचनाम्यावेळी बँक पासबुक झेरॉक्ससह आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर मंजूर भरपाईचे अनुदान थेट खात्यात जमा होत असे. या वेळी अनुदान वाटपाची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. मंजूर यादीमध्ये लाभार्थ्याला वेगवेगळे पंचनाम्याचे विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे.

तो क्रमांक घेऊन लाभार्थ्याने महा ई-सेवाकेंद्रात जायचे आहे. तेथे तो क्रमांक सरकारच्या पोर्टलवर टाकल्यानंतर लाभार्थ्याला आपल्या शेतीचे नुकसान, झालेला पंचनामा याची माहिती मिळणार आहे. त्यानंतर थम्ब देऊन आधार प्रमाणीकरण केल्यानंतर अनुदान थेट खात्यात जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणाची पावती मिळत आहे.

मात्र त्यासाठी लाभार्थ्याला प्रवासखर्चासह ५० रुपयांचा भूर्दंड पडत आहे. दरम्यान, २०२२ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या अनुदानापोटी तालुक्याला ६६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. अनुदान मंजूर लाभार्थ्याने महा ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रामाणिकीकरण केल्यानंतर बॅंकखात्यात रक्कम मिळू लागली आहे.

भिलेतील ७४ शेतकऱ्यांचे नुकसान

खाडीपट्ट्यातील करंबवणे खाडीलगत असलेल्या भिले-जांभूळवाडी खारभूमी विकास योजनेच्या उघाडीची झडपे निसटल्याने आणि त्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जुलै २०२२ मध्ये या भागातील बहुतांशी शेती पाण्याखाली जाऊन मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. अनुदान मंजूर झालेल्या यादीमध्ये या गावातील तब्बल ७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com