Narayan Rane
Narayan Raneesakal

Narayan Rane : 'ते चांगले बोलतात म्हणजे माझे ग्रह बदलले आहेत'; असं कोणाबद्दल म्हणाले नारायण राणे?

राजकारणात कधीही कुणी कायमचा दुश्मन नसतो. वैचारिक मतभेद असू शकतात.
Summary

'माझ्या प्रकृतीवरुन विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. माझ्या संयमाची पण एक लक्ष्मण रेषा ठरलेली आहे. माझी प्रकृती ठणठणीत आहे.'

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) माझ्याबद्दल चांगलं बोलतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते चांगलं बोलतात म्हणजे माझे ग्रह बदलले, असं म्हणाव लागेल, अशी मिश्कील टीपण्णी राणेंनी (Narayan Rane) आज येथे केली. राजकारणात कधीही कुणी कायमचा दुश्मन नसतो. वैचारिक मतभेद असू शकतात. मी कधीही वैयक्तिक दुश्मनी ठेवली नाही. जो आपल्याला मदत करतो, त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असेही ते म्हणाले.

Narayan Rane
Sangli Lok Sabha : हातकणंगले सोडला, सांगलीचा हट्ट का? विश्‍वजित कदमांचा शिवसेनेला थेट सवाल

श्री. राणे यांनी आज येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘दरडोई उत्पन्नात गोवा, सिक्किम, तमिळनाडू ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत. मी केंद्रात असलो तरी माझं पूर्ण लक्ष जिल्हावर आहे. ३५ वर्षांपूर्वी या जिल्ह्याच दरडोई उत्पन्न ४० हजार होत. आज ते २ लाख ४० हजार आहे‌. येत्या काळात ते साडेतीन लाखांपर्यंत पोहचवायचे आहे. विरोधकांनी केवळ माझ्यावर टीका करण्याच काम केलं. साधी बालवाडी सुद्धा सुरू केली नाही.

Narayan Rane
Satara Lok Sabha : 'मला काहीही लपवायचं नाही, मी लोकसभा निवडणुकीला उभा राहणारच'; उदयनराजेंनी केलं स्पष्ट

कोकणी माणसाचा फायदा झाला पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हाच दृष्टिकोन माझा कायम राहीला आहे‌. मिळालेल्या ज्ञानाचा व पदाचा उपयोग जिल्ह्यातील लोकांसाठी कसा करता येईल हा माझा प्रयत्न असतो.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘श्री. केसरकर माझ्याबाबत चांगले बोलत आहेत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असतात. कधीच कोण कायमचा दुश्मन नसतो. केसरकर आज माझ्याबद्दल चांगले बोलतात यांचा अर्थ माझे ग्रह बदलले असे म्हणाले लागेल. आजवर संघर्ष करून मी इथवर पोहचलो आहे.''

नगरसेवक, बीएसटी चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, विधानसभा आमदार, राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री पद आजवर मी भुषविले. कोणतही पद मागितलं नाही. गुणवत्तेवर पदे मिळविली. व्यवसायात देखील मी कष्टातून पुढे आलो आहे. कुणाचही घर पेटविण्याचा वाईट विचार केला नाही. ज्यांनी माझं घर जाळलं त्यांचीशी दुश्मनी ठेवली नाही. यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. विकास करताना नुसती दृष्टी असून चालत नाही तर डोळसपणा लागतो.’’ या वेळी दत्ता सामंत, संजू परब, महेश सारंग, विशाल परब, श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते.

Narayan Rane
'श्रीकांत शिंदेंना विरोध करणारे वाघ गेले कुठे? आता त्यांना शोधण्याची वेळ आलीये'; उदय सामंतांची टोलेबाजी

माझ्या प्रकृतीची विरोधकांना काळजी नसावी

राणे म्हणाले, ‘‘माझ्या प्रकृतीवरुन विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. माझ्या संयमाची पण एक लक्ष्मण रेषा ठरलेली आहे. माझी प्रकृती ठणठणीत आहे. विरोधकांनी त्याची काळजी करू नये. दिवसातून १८ तास मी काम करतो. नियमीत वाचन करतो. जगभरातील विविध महान लोकांची आत्मचरित्र वाचण हा माझा छंद आहे. विकासाच्या विषयावरील वाचन नियमीत करतो. अर्थशास्त्राचा अभ्यास हा माझा आवडता विषय आहे. माझी अनेक पुस्तकही प्रसिद्ध झाली आहेत. विरोधात बोलणाऱ्यांनी एक दिवस माझ्यासोबत राहून काम करून दाखवावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com