Sangli Lok Sabha : हातकणंगले सोडला, सांगलीचा हट्ट का? विश्‍वजित कदमांचा शिवसेनेला थेट सवाल

कोल्हापूरच्या बदल्यात सांगली (Sangli Lok Sabha) या विषयाला काही लॉजिक नाही.
Congress leader Vishwajeet Kadam
Congress leader Vishwajeet Kadamesakal
Summary

''आता तुम्ही हातकणंगलेला जागा घेतली आहे. मशाल चिन्हावर तुम्ही लढत आहात. सत्यजित पाटील उमेदवार आहेत, मग आता पुन्हा सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट कशासाठी?’’

सांगली : शिवसेनेला (Shiv Sena) पश्‍चिम महाराष्ट्रात एक जागा हवी होती, त्यासाठी ते सांगली मागत होते. काल त्यांनी हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातून माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आता तिथे ‘मशाल’ चिन्ह आले आहे, मग सांगलीचा हट्ट कशासाठी, असा सवाल काँग्रेस नेते, आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला आहे.

Congress leader Vishwajeet Kadam
Sangli Lok Sabha : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या उमेदवारीनंतर नवा ट्विस्‍ट; बाबर-पाटील गटाच्या भूमिकांकडं लक्ष

विश्‍वजित म्हणाले, ‘‘कोल्हापूरच्या बदल्यात सांगली (Sangli Lok Sabha) या विषयाला काही लॉजिक नाही. कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीची राज्य पातळीवर चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराजांचे नाव चर्चेला आले. शाहू महाराजांची प्रतिमा चांगली आहे. त्यांच्याबद्दल समाज मनात खूप आदराचे स्थान आहे. ते जो पक्ष निवडतील त्यांचा सन्मान ठेवावा, असे ठरले होते. त्यानुसार त्यांनी काँग्रेस निवडला.

Congress leader Vishwajeet Kadam
मनमोहन सिंगांच्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला; अमित शहांचा गंभीर आरोप

कोल्हापूर पुरोगामी जिल्हा आहे, म्हणून त्यांनी तसा विचार केला. ती जागा काँग्रेसला गेली. त्या वेळी कुठेही आदलाबदलाची चर्चा झाली नव्हती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना त्याची कल्पना होती. पश्‍चिम महाराष्ट्रात तुम्हाला जागा हवी होती. आता तुम्ही हातकणंगलेला जागा घेतली आहे. मशाल चिन्हावर तुम्ही लढत आहात. सत्यजित पाटील उमेदवार आहेत, मग आता पुन्हा सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट कशासाठी?’’

ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ज्याची जिथे ताकद आहे, नेटवर्क आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद आहे, तेथे त्या पक्षाने लढावे, असे अपेक्षित आहे. त्याअर्थाने सांगली आमची हक्काची जागा आहे. ज्या सांगलीत मी काम करतो, तेथे आग्रही राहणे माझी जबाबदारी आहे. आमचाच प्रश्‍न सुटत नसेल तर काँग्रेसच्या बैठकीला का जायचे? शिवसेनेने त्यांचे उमेदवार जाहीर केले असले तरी महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांना अजून दिशा नाही. भाजप उमेदवार जाहीर झालेत, त्यांनी आघाडी घेतली. आमचा निर्णय लवकर झाला पाहिजे.’’

Congress leader Vishwajeet Kadam
Satara Lok Sabha : साताऱ्यासाठी सिल्वर ओकवर खलबते; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, श्रीनिवास पाटलांचा पुन्हा लढण्यास नकार

राजकारण शिजतेय

विश्‍वजित म्हणाले, ‘‘सांगलीबाबत काय राजकारण शिजते आहे माहीत नाही. मला त्यात पडायचे नाही. निवडणुकीला केवळ एक महिना राहिला आहे. मला भाजपच्या ऑफरबाबत बातम्या पेरल्या जातात, त्यात मला पडायचे नाही. जे आमचे राज्यातील, दिल्लीतील नेते ठरवतील, महाविकास आघाडीचे जे ठरेल, त्यानुसार काम करू.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com