Kokan News
Kokan Newssakal

Kokan News: राऊतांनी दहा वर्षात कोणती विकास कामे केली; नारायण राणेंनी विचारला सवाल

राऊत यांना आपल्‍या गावातील रस्ताही करता आला नाही. त्‍यांच्या तळगाव या गावातील रस्ता माझ्या विकास निधीतून केला| Raut could not even walk the road in his village. The road in their village Talgaon was done with my development fund


Kankavli News: महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने विशेष उपक्रम राबवले. देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य सुरू ठेवले आहे.

याउलट खासदार म्हणून विनायक राऊत यांनी मागील १० वर्षांत काय केले ? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केला. राऊत यांना आपल्‍या गावातील रस्ताही करता आला नाही. त्‍यांच्या तळगाव या गावातील रस्ता माझ्या विकास निधीतून केला असेही श्री.राणे म्‍हणाले.


शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात कणकवली शहर महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यात राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

Kokan News
Kankavli News:'ती' बातमी छापणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

राणे म्‍हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्‍यातील शिवसेना ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही. कारण उबाठा पक्षाकडे कोणताही जनाधार राहिलेला नाही. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. या कालावधीत त्‍यांनी कोकणासाठी काय केले. रोजगार, आरोग्य दळणवळण सिंचन साठी किती निधी दिला.

कोकणी माणसामुळे शिवसेना फोफावली. पण त्याच कोकणी माणसाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले. मात्र आम्‍ही दोडामार्ग येथील एमआयडीसीमध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणणार आहे. ओरोस येथे टेक्निकल सेंटर सुरू केले आहे. फुड प्रोसेसिंग मशीन तसेच ते चालविण्याबाबतचे प्रशिक्षण तेथे देण्यात येणार आहे. इथे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना देशात परदेशातही नोकरी मिळेल. दरम्‍यान कणकवली शहरातून ९० टक्‍के मतदान महायुतीला हवे आहे असेही श्री. राणे म्‍हणाले.

Kokan News
Kankavli Crime : धक्कादायक! ओळखीचा फायदा घेत दारू पाजून युवतीवर सामूहिक अत्याचार; तीन संशयितांना अटक

आमदार नितेश राणे म्‍हणाले, लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागा. मागील पाच वर्षांत कणकवली शहराचा केलेला विकास जनतेसमोर आहे. स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायत ची सत्ता २०१८ साली ताब्यात आली. आता भाजपच्या झेंड्याखाली आपण सर्व एकवटलेले असल्याने आपली ताकद दुप्पट झाली आहे. २०१८ साली ७० टक्के मतदान आपल्याला झाले होते.

यावेळी ९० टक्के मतदान कणकवली शहरातून महायुतीला व्हायला हवे. ठाकरे सरकारने कणकवली नगरपंचायतच्या विकासकामांत नेहमी खोडा घातला. पाठवलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाला केराची टोपली कायम दाखवली. याचा जाब विनायक राऊत याना शहरवासीयांनी विचारला पाहिजे. प्रास्ताविक राजश्री धुमाळे यांनी तर, सूत्रसंचालन किशोर राणे यांनी केले.

Kokan News
Kankavli: दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क; राणे पाच वाजता साधणार संवाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com