अण्णासाहेब देसाई प्रशालेचे
''एनएनएमएस'' परीक्षेत यश

अण्णासाहेब देसाई प्रशालेचे ''एनएनएमएस'' परीक्षेत यश

77778
अनुष्का राऊळ, श्रृती राणे, साक्षी चव्हाण, ऋतुजा बागुल

अण्णासाहेब देसाई प्रशालेचे
‘एनएनएमएस’ परीक्षेत यश

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १६ ः डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे (ता. वेंगुर्ले) या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले. या प्रशालेचे १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील चौघांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
यावर्षीही प्रशालेने या परीक्षेतील उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. अनुष्का राऊळ हिने सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये १११ गुणांसह जिल्ह्यात १५ वा व तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. श्रुती राणे हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत २५ वा क्रमांक प्राप्त केला. साक्षी चव्हाण व ऋतुजा बागुल यांचीही गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. याबरोबरच निनाद राणे, राजस राऊळ, रुक्मिणी परब, कार्तिकी हडकर, मयांक घारे, सोहम कोळंबकर, श्रेया मुंडये, जिज्ञासा चिपकर, यश चिपकर, जानवी परुळेकर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना शिक्षक रीमा ठाकूर, मधुरा कदम, सोमनाथ बागुल, अमेय देसाई, प्रभू पंचलिंग, वैशाली भांगरे व तेजश्री सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने आदींनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com