रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ प्रथम

रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ प्रथम

77839
बांदा ः सर्वज्ञ वराडकर याला गौरविताना मान्यवर.

रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ प्रथम
सावंतवाडी,ता.१६ ः बांदा येथील श्री साईबाबा भक्तसेवा मंडळातर्फे आयोजित रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर याने प्रथम क्रमांक पटकावला. जुई हर्डीकर हिने द्वितीय तर दुर्वा नाटेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. रामनवमीचे औचित्य साधून रामरक्षा पठण या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ११ विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेचे उद्‍घाटन मंडळाचे विश्वस्त संदेश पावसकर यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रवींद्रनाथ मालवणकर, मंगलदास साळगावकर, अर्चना साळगावकर, उमांगी मयेकर, शिक्षक जे. डी. पाटील उपस्थित होते. स्पर्धेत उत्तेजनार्थ शिवानंद परब याला गौरविण्यात आले. या स्पर्धेत स्वामीनी तर्फे, सौम्या गावडे, तेजस्वी गुरव, काव्या सावंत, बाबुराव गवस, मानसी मौर्या, स्वरा बांदेकर यांनी पठण केले. ही स्पर्धा संदेश पावसकर यांनी पुरस्कृत केली होती. जे. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मंगलदास साळगावकर यांनी प्रास्ताविक केले. राकेश केसरकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com