दसपटीच्या समर्थ शिंदेची युपीएससीत भरारी

दसपटीच्या समर्थ शिंदेची युपीएससीत भरारी

ratchl१७२.jpg
M77986
समर्थ शिंदे
ratchl१७३.jpg
77987
समर्थचे आई, वडील व बहीण.

दसपटीच्या समर्थ शिंदेची युपीएससीत भरारी
पहिल्या फेरीतच यश; सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न होणार साकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ः बालपणापासूनच नेतृत्व आणि वक्तृत्वाचे गुण ठासून भरलेल्या येथील समर्थ अविनाश शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेत झेंडा फडकवला. युपीएससी परीक्षेत देशपातळीवर २५५वी रॅंक मिळवून तालुक्यातील दसपटी विभागात मानाचा तुरा रोवला. लहाणपणीच सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न पाहून ते साकारणाऱ्या समर्थने घेतलेली मेहनत वाखणण्यासारखीच आहे. समर्थने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले यश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.
मुळचे कळकवणे व सध्या खेर्डी सती येथे वास्तव्यास असलेले उद्योजक अविनाश शिंदे यांचा समर्थ हा मुलगा. आई नेहा शिंदे या शिक्षिका आहेत. समर्थचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण खेर्डी येथील मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण सुरू असतानाच मुख्याध्यापकांनी सनदी अधिकारी होण्याचे गूण असल्याचे समर्थला सांगितले होते. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण मॉडर्न कॉलेज पूणे येथे झाले. त्यानंतर रत्नागिरी येथील फिनोलेक्स महाविद्यालयात त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. द्वितीय वर्षात त्याला जॉर्डन येथे सेंट्रल कुलिंग सिस्टिमवरती प्रकल्प सादर करण्याची संधी मिळाली होती. शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकरिता पुण्यातील चाणक्य मंडळात त्याने प्रवेश घेतला आणि केवळ सव्वा वर्षाच्या कालावधीत युपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा मान पटकावला. समर्थमध्ये लहाणपणापासून नेतृत्व आणि वक्तृत्वाचे गुण ठासून भरलेले होते. पहिलीत असतानाच त्याने इंटरस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. अडीच वर्षाचा असताना त्याला शिशूगटात प्रवेश देण्यात आला. वडील इंजिनिअर तसेच एमबीए आणि आई प्रख्यात शिक्षिका असल्याने समर्थला लहाणपणापासन चांगले मार्गदर्शन मिळत गेले. खेर्डी येथे अभ्यासिका घेताना त्याची विविध विषयांची उजळणी होत गेली शिवाय पुण्यात चाणक्य मंडळात स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच पहिल्या तिमाहीत त्याला स्कॉलरशिप मिळाली. तेथे तासिका घेण्यासाठी त्याला चांगले मानधनही दरमहिना मिळत होते. पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र खासगी गाडी उपलब्ध होत असताना त्याने पल्बिक ट्रान्सपोर्टचा वापर केला. या साऱ्यातून त्याची चौकस बुद्धी, नेतृत्वगुण आणि दूरदृष्टी दिसत होती.
युपीएससीचा अभ्यास सुरू असतानाच त्याची एअरफोर्समध्ये पहिल्या पाचमध्ये निवड झाली होती. एअरफोर्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवत त्याने ही कामगिरी केली; परंतू सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या समर्थने एअरफोर्समध्ये न जाणे पसंत झाले. आयएएससाठी त्याने परिश्रम सुरूच ठेवले. परिणामी, जिद्ध, चिकाटी आणि चौकस विचारशैलीमुळे पहिल्याच प्रयत्नात तो युपीएससी परीक्षेत २५५ रॅंकने उत्तीर्ण झाला. समर्थची बहीण श्रावणी ही देखील तितकीच हूशार असून, ती सध्या पदवी शिक्षण घेत आहे. केंद्र सरकारच्या प्लॅनिंग कमिशनवर निवड होण्याचे ध्येय तिने ठेवले असून, तशी वाटचालदेखील ठेवली आहे. समर्थने मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्हाभरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

चौकट
समर्थच्या यशाचे गमक
शालेय वयातच अभ्यासक्रमासह केलेले अंवातर वाचन, प्रत्येक घटना समजून घेत त्याचे विश्लेषण करण्याची वृत्ती आणि नावीन्याचा ध्यास हे यशाचे गमक आहे, असे समर्थने सांगितले तसेच पाठांतरापेक्षा विषय समजावून घेण्यावर भर दिला. केवळ परीक्षेतील गुण अतिमहत्वाचे नाहीत तर संकल्पना समजून घेत ती नव्याने कशी मांडता येईल, त्याचे अधिकाधिक कसे विश्लेषण करता येईल यावर अधिक भर दिला. सहावी-सातवीपासून अवांतर वाचन सुरू केले. पुण्यात बारावीचे शिक्षण घेताना जेईईची केलेली तयारीदेखील फायदेशीर ठरल्याचे समर्थ आवर्जून सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com