राजापूर-राजापूर पालिकेची ८६ टक्के करवसुली

राजापूर-राजापूर पालिकेची ८६ टक्के करवसुली

rat१७p१२.jpg
77954
राजापूरः थकीत करदात्यांची नावे लिहिलेला फलक.
----------

राजापूर पालिकेची ८६ टक्के करवसुली
ऑनलाईन सुविधेला प्रतिसाद ; थकबाकीदारांची नावे फलकावर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः राजापूर नगर पालिकेने यावर्षी ८६ टक्के करवसुली करण्यात यश संपादित केले आहे. त्यामध्ये घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करभरणा करण्याची सुविधाही पालिकेने उपलब्ध करून दिली होती. त्यालाही करदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना ऑनलाईन पद्धतीने १८ लाख ४५ हजार ६१० तर क्युआर कोडद्वारे ५० हजार ७१८ असे मिळून १८ लाख ९६ हजार ३२८ रुपयांची वसुली झाली आहे. राजापूर पालिकेची करवसुलीची १ कोटी ९८ लाख ४८ रुपयांची मागणी होती. त्यापैकी १ कोटी ७१ हजार रुपयांची वसुली झाली आहे. त्यामध्ये मालमत्ता आणि इतर करांची ८७.२९ टक्के तर पाणीपट्टीची ८१.१६ टक्के वसुलीचा समावेश आहे. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजनबद्द राबवलेल्या करवसुली मोहिमेमुळे पालिकेला करवसुली करण्यात यश आले आहे.
कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे थेट जाहीर फलकावर लावण्यात आली. काही थकबाकीदारांची नळसंयोजनेही कापत करवसुलीची धडक मोहीम राबवली होती. त्यातून ८६ टक्के कर वसुली झाली आहे.
-----------
चौकट
राजापूर पालिकेची वसुली

कराचे नाव मागणी वसुली शिल्लक
मालमत्ता कर १०७.५ ९४.२२ १३.२८
वृक्ष कर ५.२ ३.८५ १.३५
विशेष स्वच्छता कर ०.७४ ०.५१९ ०.२२१
घनकचरा कर १२ .०७ ९.६७ २.४
रोजगार हमी कर ४.१७ ३.९ -०.०२
शिक्षण कर ३२.७ २२.४३ ३.१२
पाणीपट्टी कर ३६.१ २९.३ ६.८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com