दोन महायुतीचे आमदार

दोन महायुतीचे आमदार

१४ (निवडणूक पानासाठी)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ------लोगो

दोन आमदार महायुतीचे, एक महाविकास आघाडीचा

रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र; उशिरा उमेदवारीचा परिणाम शक्य

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदार संघात महाविकास आघाडीचे विनायक राऊत विरुद्ध युतीचे नारायण राणे अशी थेट लढत निश्चित झाली आहे. या मतदार संघात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ येतात. रत्नागिरी, चिपळूण मतदार संघात महायुतीच्या घटक पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे तिथे पारडे जड राहील तर राजापुरात ठाकरे शिवसेनेचे आमदार असल्यामुळे महाविकास आघाडीला लाभ होईल, असे राजकीय चित्र आहे; परंतु उशिरा जाहीर झालेल्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुतीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेनेदेखील या मतदार संघावर प्रबळ दावा केला होता. त्यासाठी किरण उर्फ भैय्या सामंत त्यासाठी इच्छुक होते. उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या आठवडाभरात ते मुंबईत ठाण मांडून होते; परंतु काही जागांवर तडजोड करत ही जागा भाजपला सोडण्यात आली. गेले दोन महिने लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीमध्ये शिवेसना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अन्य पक्षांचा यामध्ये समावेश आहे तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, शरद पवाराची राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांचा यामध्ये समावेश आहे.
रत्नागिरी, लांजा-राजापूर, चिपळूण या तीन विधानसभा मतदार संघांचा यामध्ये समावेश आहे. रत्नागिरीत विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. सामंतांचा व्यक्तिगत या मतदार संघावर प्रभाव आहे. त्यांना प्रबळ विरोधकही नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीला सेना सामोरे जात आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात उबाठा शिवसेना रूजलेली आहे; परंतु शिवसेनेची ताकद असतानादेखील उदय सामंत चारवेळा आमदार झाले आहेत. भाजपचाही या मतदार संघात एक वर्ग आहे. हा पारंपरिक मतदार कुठेही जात नाही. अजित पवार राष्ट्रवादीचा प्रभाव मात्र या मतदार संघात नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना एकत्र आली तर चांगले मताधिक्य मिळु शकते.
चिपळूण विधानसभा मतदार संघातदेखील महायुतीची ताकद आता वाढली आहे. गेल्या विधानसभेत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शेखर निकम हे निवडून आले. त्यामुळे सदानंद चव्हाण आणि शेखर निकम यांनी ताकद लावल्यास चांगले मताधिक्य मिळेल, असे चित्र आहे. लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघात वेगळी परिस्थिती आहे. या मतदार संघात शिवसेनेचे (उबाठा) आमदार राजन साळवी हे आमदार आहेत. काँग्रेसचीही या मतदार संघात मोठी ताकद आहे. त्यामुळे या मतदार संघात महाविकास आघाडीला मतांची ताकद मिळेल, असे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com