मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणा

मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणा

निवडणूक पानासाठी

swt1813.jpg
78237
शिरोडाः येथील श्री माऊली सभागृहात आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केंद्रीयमंत्री नारायण राणे. व्यासपिठावर उपस्थित इतर मान्यवर.

मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणा
नारायण राणे ः शिरोडा येथे महायुती मेळावा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ ः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक अर्थव्यवस्थेत भारत २०३० मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. विकसित भारत बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असा दावा केला आहे. कर्तुत्ववान व्यक्ती भारताला पंतप्रधान म्हणून लाभलेली आहे. आणि म्हणून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिरोडा येथे केले.
शिरोडा येथील श्री माऊली सभागृहात आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. श्री. राणे म्हणाले, "वेंगुर्ले अतिशय निसर्गरम्य तालुका आहे. एखादी अमेरिकन किंवा ब्रिटनची युनिव्हर्सिटी याठिकाणी व्हावी हा माझा प्रयत्न राहणार आहे. दोडामार्गमध्ये गोल्फ क्लबसाठी ५०० एकर जागा पाहिजे आहे. हा गोल्फ क्लब झाल्यास जगातले खेळाडू याठिकाणी येतील लाखो रुपये खर्च करतील आणि यामुळे या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढेल. आणि ते वाढावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील युवकांनी नोकरी करण्याऐवजी उद्योजक बनावे हे माझे स्वप्न आहे. ज्यावेळी मी १९९० ला या जिल्ह्यात आलो, त्यावेळी कोकणातील जनतेचे सरासरी उत्पन्न ३५ हजार होतं. आज २ लाख ४० हजार आहे. तेच सरासरी उत्पन्न ३.५० ते ४ लाख व्हावं ही माझी अपेक्षा आहे. रेडी पोर्टला ४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. आपल्याकडील सर्वमाल जगभर जाऊ शकतो. जगातला सर्व या ठिकाणी येऊ शकतो असं बंदर विकसित होणार आहे."
शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, "भारत मातेचा जो स्वाभिमान आहे तो जगामध्ये कोणी उंचावत नेला असेल तर तो पंतप्रधान मोदी यांनी नेला आहे. एवढे नेते व्यासपीठावर आहेत तर विजय महायुतीचा निश्चित आहे. देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर मोदी यांना मत दिले पहिजे. श्री. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी अनेक वर्ष काम केले आणि करत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची संधी सर्वांना लाभली आहे. त्याचा फायदा करूया."
यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा नियोजन सदस्य दिलीप गिरप, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, आरवली सरपंच समीर कांबळी, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, कोचरा सरपंच योगेश तेली, शिवसेना तालुका संघटक बाळा दळवी, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शिवसेना महिला जिल्हा संघटक नीता कविटकर, तालुका संघटिका प्राची नाईक कोस्टेल तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, कौशिक परब, राहुल गावडे, अमित गावडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रितेश राऊळ यांनी तर सूत्रसंचालन काका सावंत यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com