कासार्ड़े विद्यालयाच्या तिघांना शिष्यवृत्ती

कासार्ड़े विद्यालयाच्या तिघांना शिष्यवृत्ती

swt1817.jpg
78256
सर्वेश कदम

कासार्ड़े विद्यालयाच्या
तिघांना शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेतलेल्या ''एनएमएमएस'' शिष्यवृत्ती परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी सर्वेश कदम हा विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. त्याने या परीक्षेत एस. सी. प्रवर्गातून ८० गुणांसह गुणवत्ता यादीत १२ वे स्थान पटकावले आहे. याच परीक्षेत रिया सावंत, सोहम बाक्रे, सृष्टी राणे व अमोल जाधव हे विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. पैकी सृष्टी राणे व रिया सावंत या दोन विद्यार्थिनी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ‘एन्एमएमएस’ विभागप्रमुख डी. डी. मिठबावकर, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. डी. भोसले, विषय शिक्षक प्रियांका सुतार, ऋषिकेश खटावकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समिती, स्कूल कमिटी, मुख्याध्यापक एन. सी. कुचेकर, पर्यवेक्षक एस. डी. भोसले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com