''निर्भय बनो''मधून मतदान जनजागृती

''निर्भय बनो''मधून मतदान जनजागृती

swt194.jpg
78478
सावंतवाडीः येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. संदीप निंबाळकर.

‘निर्भय बनो’मधून मतदान जनजागृती
निंबाळकर, वरकः सावंतवाडीसह कुडाळात उद्या सभा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान विरोधी काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ‘निर्भय बनो’ अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मतदारांत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत या अभियानाचे समन्वयक अॅड. संदीप निंबाळकर व किशोर वरक यांनी दिली. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रविवारी (ता.२१) सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत तर सकाळी १० वाडता कुडाळ येथे सभा आयोजित केली आहे.
लोकशाही आणि संविधानबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात डॉ. विश्वंभर चौधरी व ॲड. असिम सरोदे यांनी सुरू केलेल्या ‘निर्भय बनो’अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी व कुडाळ रविवारी जाहीर सभा आयोजित केली आहे. लोकशाही व संविधान हरण करणाऱ्या निर्भय बनो सभेतून प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावंतवाडी येथे गांधी चौकात सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. या सभेस ॲड. असिम सरोदे व डॉ. विश्वंभर चौधरी हे भारतीय संविधान, लोकशाही, आणि सध्याची देशातील परिस्थिती यावर भाष्य करणार आहेत. या सभेचे समन्वयक निर्भय बनो अभियान व आम्ही निर्भय सिंधुदुर्गकर समिती सर्व समन्वयकानी आयोजित केली आहे. सावंतवाडी व कुडाळ येथील सभेत प्रत्येकी दोन हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी अपेक्षा आहे. राज्यात आणि कोकणात निर्भय बनो अभियानांतर्गत नागरिकांत जनजागृती करण्यात येत आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ आज हरण केले जात आहेत. आमदार आणि खासदार विजयी झाल्यानंतर ईडीचा धाक दाखवून पळवून नेलेले आहेत. पत्रकारीता, न्यायालय अशा प्रत्येक पातळीवर लोकशाही आणि संविधान गुंडाळून ठेवले आहे. याबाबत जनजागृती केली जाईल. सत्ताधाऱ्यांना यामाध्यमातून प्रश्न विचारले जातील. कोणाही व्यक्ती किंवा राजकीय पक्षांच्या विरोधात हे निर्भय बनो अभियान आहे. अभिनेता नंदू पाटील यांनी लोकशाही, संविधान अभ्यासून जनतेला जागृत केले पाहिजे. मणिपूरमध्ये स्त्रीयांना झालेल्या त्रासाबद्दल पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही असे प्रश्न विचारले जातील, असे सांगितले. यावेळी उपस्थित अॅड. निंबाळकर, किशोर वरक, श्री. पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com