ः 47 रेशन दुकानांना ई-पॉस मशिन

ः 47 रेशन दुकानांना ई-पॉस मशिन

४२ (पान ५ साठी)


- rat१९p३०.jpg-
२४M७८५३८
मंडणगड: तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील दुकानदारांना इ पॉस मशिनचे वाटप करताना तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली व दुकानदार.

मंडणगडात ४७ रेशन दुकानांना ई-पॉस मशिन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ ः राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत संगणकीकरण प्रकल्प २०१७ पासून राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत मंडणगड तालुक्यातील ४७ रास्तभाव धान्य दुकानांना जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या नवीन ई-पॉस मशिनचे वितरण तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांच्या हस्ते करण्यात आले.
तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर मशिनचे उद्घाटन झाले. या वेळी उपस्थित सर्व दुकानदारांना नवीन E-Pos मशिनबाबत तांत्रिक साहाय्यक चिकटे व उपानेकर यांनी प्रशिक्षण दिले. या प्रसंगी महसूल नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, पुरवठा निरीक्षक मयुर पौळ, रास्त दुकानदार संघटना मंडणगड तालुकाध्यक्ष प्रदीप मालुसरे, सदस्य प्रताप घोसाळकर, अनंत केंद्रे, रिकामे, दळवी व सर्व रास्तभाव दुकानदार उपस्थित होते. नवीन मशिन आल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना यामुळे धान्य घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com