Katal Shilpa in Ratnagiri
Katal Shilpa in Ratnagiriesakal

Katal Shilpa : कोळंबे रक्षणेश्वराच्या सड्यावर सापडला तब्बल 42 कातळशिल्पांचा खजिना, काय आहे खासियत?

कोळंबे ओझरवाडीतील स्वयंभू श्री देव रक्षणेश्वराच्या सड्यावर ४२ कातळशिल्पांचा नवा खजिना सापडला आहे.
Summary

गेली १२ वर्षे चालू असलेल्या कातळशिल्प शोधकार्यात एक मैलाचा दगड गाठण्यात यश आले आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे ओझरवाडीतील स्वयंभू श्री देव रक्षणेश्वराच्या सड्यावर ४२ कातळशिल्पांचा नवा खजिना सापडला आहे. कोळंबे येथील बापू फडके यांच्या सूचनेवरून कातळशिल्प (Katal Shilpa in Ratnagiri) अभ्यासक आणि कातळशिल्प संशोधन केंद्राने येथे शोधमोहीम आखली आहे. पूर्व-पश्चिम दिशेने सुमारे ३०० मीटर परिसरात ३-४ ठिकाणी पसरलेल्या या रचनांमध्ये दोन प्राण्यांच्या रचना सोडल्यास उर्वरित सर्व रचना सांकेतिक (भौमितिक) स्वरूपाच्या आहेत.

Katal Shilpa in Ratnagiri
हमीदवाडा कारखाना कर्नाटकातील बड्या नेत्याला विकला? मुश्रीफ म्हणाले, राजकारणासाठी किती बदनामी..

साधारण ३ फूट लांब व ३ फूट रुंदीपासून १८ फूट लांब व तेवढीच रुंद अशा या चित्र रचना आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांच्या संशोधनानंतर कातळशिल्पांची एकूण संख्या २२०० च्या वर गेली आहे. कोळंबे येथील घनश्याम उर्फ बापू फडके यांनी पाठपुरावा केला व शहरातील कातळशिल्प संशोधन केंद्राला भेट दिली व नंतर लगेचच संशोधन केंद्राची टीम व संशोधनाकरिता आलेल्या दिल्ली येथून जेएनयू विद्यापिठाची (JNU University) संशोधकांची टीमनेही भेट दिली. श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड अनुभवायला मिळणारा सुंदर आणि धीरगंभीर असा हा स्वयंभू देव श्री रक्षणेश्वराचा परिसर फडके परिवाराने जपला आहे.

ओझरवाडी येथे जाताना एक वहाळ लागतो. या पात्रात पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेला एक लहानसा डोह असून, डोहाच्या कडेवर स्वयंभू रक्षणेश्वर आहे. सुमारे फूट, दीड फूट खोलीचा गोलाकार खळगा. या खळग्याच्यामध्ये शंकराच्या पिंडीसारखा आकार असून, हाच तो स्वयंभू देव रक्षणेश्वर आहे. येथे दगडांचा एक मोठा ढीग असून, या भागाला भुताचा वरंडा म्हणतात. दगडी ढीगाच्या बाजूच्या अस्पष्टपणे ४ कातळशिल्पे आहेत. तासाभराच्या शोधमोहिमेनंतर २० कातळशिल्प रचना दिसल्या. त्यानंतर दोन तास साफसफाई केल्यावर सुमारे २० फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद अशी रचना दिसली.

Katal Shilpa in Ratnagiri
National Anthem : 'या' मराठी खासदारामुळेच संसदेत राष्ट्रगीत गायला झाली सुरुवात..

जवळपास ४० शिल्प या परिसरात आहेत. संशोधकांनी प्राथमिक टप्प्यातील सर्व नोंदी, आवश्यक छायाचित्रे घेतली. आतापर्यंतच्या कातळशिल्प संशोधनामुळे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी (मद्रास) आणि निसर्गयात्री संस्था (रत्नागिरी) यांच्या तर्फे संचलित कोकणातील कातळशिल्प संशोधन केंद्र रत्नागिरीत सुरू झाले. काही कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून, युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत ही कातळशिल्पे समाविष्ट आहेत.

Katal Shilpa in Ratnagiri
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीचा निकाल सांगा आणि 21 लाख रुपये जिंका; 'अंनिस'चे ज्योतिषाचार्यांना आव्हान

गेली १२ वर्षे चालू असलेल्या कातळशिल्प शोधकार्यात एक मैलाचा दगड गाठण्यात यश आले आहे. शोधकार्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कातळशिल्प ठिकाणांच्या गावांची संख्या ११६ (१९० ठिकाणे) झाली असून, २२०० पेक्षा अधिक कातळशिल्प उजेडात आली आहेत. लवकरच नवीन ठिकाणांसह अजून खूप काही समोर येणार आहे, ज्यावर सध्या सविस्तर काम चालू आहे.

-सुधीर रिसबूड, कातळशिल्प शोधकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com