Deepakadi Kokanens
Deepakadi Kokanensesakal

देवरुख सड्यावर दीपकाडीच्या नव्या वाणाची नोंद; IUCN च्या लाल यादीत संकटग्रस्त प्रजाती म्हणून स्थान

दीपकाडी कोकणेन्स या शास्त्री या नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते.
Summary

भारतातील दीपकाडी प्रजातीच्या वर्गीकरणावर हेन्सल रॉड्रिक्स, सुचंद्रा दत्ता आणि किरण चक्राल हे वनस्पतीशास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.

रत्नागिरी : कोकणात आढळणाऱ्या एकदांडी म्हणजेच दीपकाडी कोकणेन्स (Deepakadi Kokanens) या प्रजातीच्या नव्या वाणाची नोंद झाली आहे. संगमेश्वर (Sangameshwar) तालुक्यातील देवरूखमधील सड्यावरून या वाणाची नोंद केली असून, त्याचे नाव देवरुखेन्स असे ठेवले आहे. नव्या वाणाच्या नोंदीमुळे देवरुखमधील सड्यांचे जैविक (Biological) महत्व अधोरेखित झाले आहे.

दीपकाडी कोकणेन्स या शास्त्री या नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचे अस्तित्व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मिळून सुमारे ३० ठिकाणांवर आहे. त्यामुळे आययूसीएनच्या लाल यादीत या प्रजातीला संकटग्रस्त प्रजाती म्हणून स्थान दिले आहे.

Deepakadi Kokanens
Katal Shilpa : कोळंबे रक्षणेश्वराच्या सड्यावर सापडला तब्बल 42 कातळशिल्पांचा खजिना, काय आहे खासियत?

भारतातील दीपकाडी प्रजातीच्या वर्गीकरणावर हेन्सल रॉड्रिक्स, सुचंद्रा दत्ता आणि किरण चक्राल हे वनस्पतीशास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. या अभ्यासदरम्यान त्यांनी दीपकाडी कोकणेन्स या प्रजातीच्या देवरुखेन्स या नव्या वाणाची नोंद केली आहे. या संदर्भातील संशोधन गुरूवारी (ता. १८) एप्रिलला फायटोटॅक्सा या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

साडवलीच्या सड्यावरून दीपकाडी कोकणेन्सच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे. एका प्रजातीमधून नव्या प्रजातीची निर्मिती ही हजारो वर्षाच्या कालावधीत होते. या विकासाच्या प्रक्रियेत प्रजातीत अनेक बदल होतात आणि हे नवे बदल म्हणजे त्यांचे विविध वाण असतात. साडवलीच्या सड्यावर आढळणाऱ्या दीपकाडी कोकणेन्स च्या प्रजातीमध्ये आम्हाला रत्नागिरीत आढणाऱ्या दीपकाडी कोकणेन्सपेक्षा आकार शास्त्राच्या अनुषंगाने काही बदल जाणवले.

Deepakadi Kokanens
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीचा निकाल सांगा आणि 21 लाख रुपये जिंका; 'अंनिस'चे ज्योतिषाचार्यांना आव्हान

पाने, फुले, आणि कॅप्सुलच्या आकारात बदल असले तरी हे बदल साडवलीतील दीपकाडीला नवी प्रजात घोषित करण्याएवढे नसल्याने आम्ही त्यांची नोंद नवीन वाण म्हणून केली आहे. मूळ दीपकाडी कोकणेन्सच्या दलपुंजाची (करोला) लांबी पाच सेमी असून देवरुखेन्स या वाणाच्या दलपुंजाची लांबी तीन ते साडेतीन सेमी आहे. दीपकाडी कोकणेन्सच्या दलपुजांची लांबी मोठी असल्याने त्याची परागीभवन निशाचर पतंगाकडून होत असल्याची शक्यता आहे.

सह्याद्री संकल्प सोसायटी गेली चार ते पाच वर्षे देवरुख परिसरातल्या सड्यांची जैवविविधता जोपासण्यासाठी संशोधन आणि संवर्धन कार्यक्रम राबविवत आहे. देवरुखमधील सडे हे सगी मालकीचे असून, येथील संकटग्रस्त प्रदेशनिष्ठ प्रजाती टिकाव्यात म्हणून आम्ही सोसायटीतर्फे शाळा, महाविद्यालये आणि गावकऱ्यांचे प्रबोधन करीत आहोत. एकदांडीच्या नव्या वाणाच्या नोंदीमुळे आणि त्याला दिलेल्या नावामुळे देवरुखमधील सड्यांचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे.

- प्रतीक मोरे, सोसायटीचे कार्यकारी संचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com