‘कणकवली अभियांत्रिकी’ला
जर्मनच्या शिष्टमंडळाची भेट

‘कणकवली अभियांत्रिकी’ला जर्मनच्या शिष्टमंडळाची भेट

79338
कणकवली : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला जर्मनीच्या शिस्टमंडळाने भेट दिली.

‘कणकवली अभियांत्रिकी’ला
जर्मनच्या शिष्टमंडळाची भेट

‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ लवकरच

कणकवली, ता. २३ : जर्मनीच्या शिष्टमंडळाने येथील एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयात ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी दिली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील बेरोजगार तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना जर्मनी येथे कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या जर्मन भाषेचे प्रशिक्षणही या सेंटरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या जर्मनीच्या शिष्टमंडळामध्ये डॉ. नशीब इसुफाज (मेडिकल), रोलांड हास, पौलिना जोवरस्का, अँडरास रिफस्टेक, बस्टियन मुल्लर, हेराल्ड कुंझेंडॉर्फ, कविता सन्यासी राव हे जर्मनीवरून व त्यांच्यासोबत ओमकार कलवडे, संतोष देशपांडे, सूरज परब, प्रसन्न शिरोडकर हे उपस्थित होते. या शिष्टमंडळाने संस्थापक तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, अध्यक्षा नीलम राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com