देवरूख बसस्थानकाची केली पाहणी

देवरूख बसस्थानकाची केली पाहणी

२० (पान ५ साठी)
-----------
- rat२३p३.jpg -
२४M७९२६८
स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत देवरूख आगाराचे सर्वेक्षण.

देवरूख बसस्थानकाची समितीकडून पाहणी

स्वच्छतेबाबत समाधान; बागनिर्मितीसह पार्किंग सुविधा करा

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २३ : स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत देवरूख बसस्थानकाची पाहणी केली. त्यामध्ये बसेसमधील स्वच्छता, पाण्याची टाकी, स्थानकाच्या परिसराची पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांसाठी असलेले विश्रांतीगृह, प्रसाधनगृह याची पाहणी केली. सध्याची साफसफाई व स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राज्यभर राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षाच्या कालावधीतील चौथे व शेवटचे सर्वेक्षण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, प्रवासीमित्र, पत्रकार मित्र यांच्याकडून करण्यात आले. या सर्व्हेक्षण समितीमध्ये महामंडळाचे तपासणी अधिकारी, कोल्हापूरच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, उपयंत्र अभियंता सुकन्या मानकर, विभागीय अभियंता मनोज निंग्रज यांच्याबरोबरच पत्रकार सचिन मोहिते, प्रवासीमित्र निखिल कोळवणकर, योगेश फाटक हे होते. या वेळी अधिकारी व प्रवासीमित्र यांनी बसेसमधील स्वच्छता, पाण्याची टाकी, स्थानकाच्या परिसराची पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांसाठी असलेले विश्रांतीगृह, प्रसाधनगृह याची पाहणी केली. सध्याची साफसफाई व स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी बाकी आगारांपेक्षा देवरूख आगाराचे कौतुक करण्यात आले तसेच बसस्थानकामध्ये साफसफाई, एसटीसह पर्यटन या योजनेंतर्गत सहलींचे आयोजन अशाप्रकारे उपक्रम राबवले जातात तसेच इतर सेवा कशाप्रकारे दिल्या जातात याची माहिती घेतली. या वेळी आगार परिसरात बागेची निर्मिती, पार्किंगची सुविधा याबरोबरच आवश्यक बाबींची पूर्तता करता येऊ शकेल या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी देवरूखचे आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे, वरिष्ठ लिपिक मनोहर मोहिते, आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक नंदकुमार बोथले, सदानंद पवार, स्थानकप्रमुख कैलास साबळे, सर्व कर्मचारी उपस्थित होते. आगाराच्या पालक अधिकारी मृदुला जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे आगार व्यवस्थापक फडतरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com