समुद्राची भिती घालवण्यासाठी प्रशिक्षक बनलो

समुद्राची भिती घालवण्यासाठी प्रशिक्षक बनलो

१० (पान ४ साठी, मेन)
-----------
- rat२६p१४.jpg -
P२४M७९९३३
पावस ः गोळप कट्टातर्फे प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचे स्वागत करण्यात आले.

समुद्राची भीती घालवण्यासाठी प्रशिक्षक बनलो

शंकरराव मिलके ः २५ हजार जणांना पोहायला शिकवले

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २६ ः दिवसभर काम करून रात्री भरणाऱ्या शिक्षणवर्गात चौथीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर सैन्यात भरती झालो. निवृत्तीनंतर एसटीमध्ये नोकरी करतानाच मुलांना समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. मुलांमधील समुद्राची भीती घालवण्यासाठी पावले उचलली. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी स्वतःच्या मुलांना समुद्रात पोहण्यास शिकवले. सध्या त्यांच्या प्रशिक्षणवर्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे स्विमिंग प्रशिक्षक शंकरराव मिलके यांनी सांगितले.
गोळप कट्टा येथील ५४व्या कार्यक्रमात माजी सैनिक आणि महाराष्ट्रातील समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण देणारे एकमेव असलेले शंकरराव मिलके यांनी जीवनप्रवास सांगितला. ते मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावचे; मात्र ते रत्नागिरीकर झाले आहेत. ते म्हणाले, माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात. घरी शेती होती. ग्रामीण भाग असल्यामुळे कसल्या सोयी नव्हत्या. लहानपणापासून शेतीची कामे करण्याची आवड होती. स्वातंत्र्य मिळाल्याने सगळीकडे स्वातंत्र्यसैनिकांबद्दल चर्चा सुरू असायच्या. त्यामुळे आपणही देशासाठी काही केले पाहिजे, असे वाटायचे. १९६०ला गोवा स्वतंत्र झाला त्या वेळी देशाचे सैनिक आमच्या गावाजवळून वाहनाने गोव्यात जात. ते सैनिक, त्यांचा रूबाब पाहून सैनिक व्हावे, असे वाटले. १९६२ मध्ये सैन्यात भरती झालो. तिथे जबलपूरला प्रशिक्षण होते. वायरलेस सिग्नल आणि चालकाचे काम मिळाले. चौथी पास असल्यामुळे हिंदी-इंग्रजी येत नव्हते. प्रशिक्षण सुरू असताना रात्री जागून हिंदी आणि रोमन हिंदी शिकलो. प्रशिक्षणातच पोहणे आणि सर्व खेळात भाग घेत असे.
पोहण्याविषयी माहिती देताना ते म्हणाले, रत्नागिरीत असताना किनाऱ्यावर फिरताना मुले, नागरिक समुद्राला घाबरतात हे लक्षात आले. ही भीती घालवण्यासाठी समुद्राचा अभ्यास केला. भरती, ओहोटी, लाटा, भोवरे, पाणी सगळ्याचा अभ्यास केला. त्यासाठी फिशरिज कॉलेज, नेव्ही, तटरक्षक दल, मच्छीमार या सगळ्यांकडे जाऊन परिपूर्ण माहिती घेतली. प्रथम माझा लहान मुलगा, मुलगी यांना समुद्रात पोहायला शिकवले. त्यानंतर १९८४ पासून नर्मदा जेटी येथे मुलांना, मोठ्यांना समुद्रात पोहायला शिकवायला सुरवात केली. आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातील २५ हजारपेक्षा जास्त लोकांना पोहायला शिकवले.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com