‘कलरफुल्ल’ मराठी नेता

‘कलरफुल्ल’ मराठी नेता

80141
वसंत साठे


‘कलरफुल्ल’ मराठी नेता

लीड
आज आपण जेव्हा घरामध्ये ‘एलसीडी’ (LCD) आणि ‘एलईडी’बाबत (LED) चर्चा करत असतो, तेव्हा आपणाला हे पटणंदेखील अवघड होऊन जाईल की, भारतात रंगीत टीव्ही आणण्यासाठी एक मराठी नेता रात्रंदिवस राबत होता. माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कारभार पाहत ही व्यक्ती विरोध करणाऱ्या संघ, समाजवादी, कम्युनिस्टच काय, तर खुद्द आपल्या पक्षातील व मंत्रालयातील लॉबीलादेखील टक्कर देत रंगीत टीव्ही आणण्यासाठी झपाटून गेली होती. ही गोष्ट आहे काँग्रेसचे नेते वसंत साठे यांची.
- सतीश पाटणकर
.............
वसंत साठे म्हणजे ‘कलरफुल्ल’ माणूस. इतका कलरफुल्ल की, त्यांचे राज कपूरबरोबर अगदी जवळचे संबंध होते. याच मैत्रीतून त्यांनी ‘बॉबी’ सिनेमाचे डायलॉग लिहिण्यासाठी देखील हातभार लावला. त्यांच्याच लिखाणातून उतरलेले एक वाक्य म्हणजे ‘जब तक सूरज, चाँद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा’. माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कारभार पाहणारे वसंत साठे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ती माहिती पाहून त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की, एक प्रचंड मोठी लॉबीच भारतात रंगीत टीव्हीचा विरोध करत आहे. यात ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीचे व्यापारी होते, काँग्रेसचे बडे मातब्बर पण होते आणि रंगीत साम्राज्यवादाची भीती दाखविणारे संघापासून ते कम्युनिस्टांपर्यंत सर्वच कार्यरत होते. या सर्वच गोष्टींचा अंदाज घेऊन साठेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रंगीत टीव्हीचा प्रस्ताव मांडला तेव्हा दूरदर्शनच्या साध्या मनोऱ्यावरून रंगीत प्रक्षेपण करता येणार नाही, असे सांगण्यात आले.
त्यासाठी विशेष उपकरणाची आवश्यकता होती. साठेंनी चौकशी करून दिल्लीतल्या अमेरिकन अॅम्बेसीतून ते उपकरण मागवले. रात्री ११ नंतर त्याची चाचणी घेण्यात आली. ती पूर्ण यशस्वी झाली आणि साठेंनी अधिकाऱ्यांचा पहिला शब्द खोटा ठरवला. लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन रंगीत टीव्ही ठेवून हे प्रक्षेपण इंदिरा गांधींना दाखविण्यात आले. शेवटी तो दिवस उजाडलाच, जेव्हा वसंत साठेंच्या प्रयत्नांना यश आले.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com