शिक्षणाचं पहिल पाऊल सोहळा

शिक्षणाचं पहिल पाऊल सोहळा

६ (पान ५ साठी)

शिक्षणाचं पहिलं पाऊल
सोहळा साजरा

गावतळे ः निपूण भारतअंतर्गत तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेकविध उपक्रम राबवले जातात. मूल पहिले सहा वर्षे आपल्या आईचे बोट धरून अंगणवाडी ताईच्या मदतीने शिकत असते तर सहा वर्षे पूर्ण होताच पहिलीच्या वर्गात प्रवेश करते. हेच ते पहिले पाऊल जे अनौपचारिक शिक्षणासाठी शाळेच्या प्रांगणात पडते. आज कोळबांद्रे केंद्राचा शाळापूर्व तयारी मेळावा (अर्थात, शिक्षणाचं पहिलं पाऊल) संजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी लिहिलेलं पहिलं पाऊल हे गीत जंगम यांच्याच संगीतसाथीने गायन केले. मार्गदर्शक संतोष आग्रे व विकास पटले यांनी मेळाव्याची गरज, व्याप्तीविषयक मार्गदर्शन करत मंगलमय वातावरणात मुलांचा प्रवेशोत्सव कसा करावा, प्रवेश घेतलेले मूल शाळेत कसे टिकून राहील या विषयी घ्यावयाची दक्षता विषद केली.

------------

बालमेळाव्यांचे दापोलीत आयोजन

गावतळ ः खेळ आणि कृतीद्वारे बालकांच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन दापोली तालुका प्रकल्पाधिकारी शोभा सावंत यांनी केले. पालनपोषण उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील सहा प्रभागात प्रशिक्षणावेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. दापोली तालुक्यातील कादीवली, हर्णे, केळशी, शिरखल, पिसई आणि दापोली येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या पुढाकाराने जन्मापासून ३ वर्ष वयोगटातील बालके व माता यांच्यासाठी पालनपोषण उपक्रमांतर्गत दापोली प्रकल्पामधील ६ प्रभागात १७९ अंगणवाडी सेविकांचे दोनदिवसीय प्रशिक्षण दापोली प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शोभा सावंत, पर्यवेक्षिका मानसी तुळसकर यांच्या मार्गदर्शनात बालमेळावे आयोजित केले. जागतिक मलेरिया दिनाचे औचित्य साधून मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनेविषयी माहिती देण्यात आली. प्रारंभी रत्नागिरी तालुक्यामध्ये हा पायलट प्रोजेक्ट राबवला गेला. त्यानंतर पूर्ण जिल्हामध्ये हा प्रोजेक्ट सुरू करताना दापोली प्रकल्पाचे जिल्ह्यात पहिले प्रशिक्षण झाले.
-----------

रायपाटणमध्ये १०ला आरोग्य शिबिर

राजापूर ः तालुक्यातील रायपाटण गांगणवाडी येथील जागृत सेवा मंडळाच्यावतीने अक्षयतृतियेच्या उत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. १०) आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या वेळात श्रीवडचीआई मंदिर येथे एसएसपीएम मेडीकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल ब्लडसेंटर आणि हेल्थ चेकअप् टीम पडवे सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने होणार आहे. या शिबिरामध्ये रक्तदानासह डोळे तपासणी, शूगर चेकअप्, रक्तदाब तपासणी, मोफत गोळ्या व औषधांशिवाय उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोफत सल्ला दिला जाणार आहे. त्याचा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

--------

- rat२७p५.jpg ः
P२४M८०१२६
डॉ. पी. एस. मेश्राम

मुंबई विद्यापीठाच्या
सदस्यपदी डॉ. मेश्राम

राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. एस. मेश्राम यांची मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या रिसर्च अ‍ॅडव्हायझरी कमिटीच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मेश्राम पीएचडी मार्गदर्शक म्हणूनही काम करत आहेत. त्यांच्या झालेल्या या नियुक्तीबद्दल संस्थाध्यक्ष मनोहर खापणे, सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे, प्राध्यापकृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com