कार्यकर्त्याचे बळ मिळवायला नेत्यांची धावपळ

कार्यकर्त्याचे बळ मिळवायला नेत्यांची धावपळ

२९ ( पान ५ साठी )

कार्यकर्त्याचे बळ मिळवायला नेत्यांची धावपळ

खडेबोलही पडतात कानी; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः अनेक नेत्यांसह उमेदवारांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज असल्याचे चित्र दिसत असले तरी त्याचे मतपेढीमध्ये परिवर्तन होईलच असे सांगता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीत विजयाची गुढी उभारण्यासाठी नेत्यांना कार्यकर्त्यांचे बळ मिळणे गरजचे आहे. हे बळ मिळवण्यासाठी नेत्यांची मात्र धावपळ सुरू झाली आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांनी कार्यकत्याशी संपर्क साधणे सुरू केले आहे; मात्र, आतापर्यंत आठवण केली नाही असे म्हणत कार्यकर्त्यांकडून नेत्यांना खडेबोल सुनावले जात आहेत. जवळच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना हेरून गावगड्यातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र, आता कार्यकर्तेही सावध झाले असून, फुंकूनच ताक पिण्याकडे त्यांचा कल दिसत आहे. तरीही स्थानिक पदाधिकारी नेत्यांना कार्यकर्ते कामाला लागतील असा धीर देत आहेत; मात्र, तरीही कार्यकर्त्याकडून दगाफटका तर मिळणार नाही ना? या धाकधुकीने नेत्यांच्या मनामध्ये घर केल्याचे दिसत आहे.
राजकीय पक्षांसह नेत्यांकडून कार्यकर्त्यांची फळी असली तरी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे आव्हान नेत्यांसमोर ठाकले आहे. त्यातूनच, विजयाची गुढी उभारण्यासाठी जुळवाजुळव आणि बेरजेची गणिते करताना झाले गेले विसरून कामाला लागण्यासाठी नेते कार्यकर्त्यांपुढे पायघड्या घालताना दिसत आहेत. ऐन शिमगोत्सवामध्ये लोकसभा निवडणुकीचा ढोल वाजला आहे. या निवडणुकीची लढत निश्‍चित झाली असून मतदानासाठी अवघे अकरा-बारा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराची राळ उडवली आहे. त्याचवेळी खासगीमध्ये आकडेमोड करत विजयाच्या मताधिक्क्याचे इमलेही बांधायला सुरवात केली आहे.
-------

चौकट ः

कार्यकर्ते सोशल मीडियावर आक्रमक

पूर्वीसारखे आता कार्यकर्ते सतरंजी उचलण्यापुरते आणि झेंडे हातामध्ये घेऊन घोषणा देण्यापुरते राहिलेले नाहीत. सोशल मीडियावर विरोधकांना सडेतोड उत्तरेही ते देतात. पूर्वी जाहीर सभांमधून नेत्यांमध्ये रंगणारे आरोप-प्रत्यारोप आता सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्ये रंगताना दिसतात. सोशल मीडियावरील निवडणूक आयोगाच्या करड्या नजरेमुळे आक्रमक पोस्ट करणाऱ्‍या कार्यकर्त्यांना आवर घालणे नेत्यांना आव्हानात्मक ठरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com