भाजपचे निवडणूक निरीक्षक जाहीर

भाजपचे निवडणूक निरीक्षक जाहीर

भाजपचे निवडणूक निरीक्षक जाहीर

रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहाजणांची या पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आमदार, माजी मंत्री, खासदार, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.
या सर्वांवर ५ मेपर्यंत दिलेल्या विधानसभा क्षेत्रात पूर्णवेळ मुक्कामी जाऊन प्रत्येक बूथ विजयी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चिपळूण विधानसभेसाठी नागपूर दक्षिणचे आमदार मोहन मते, रत्नागिरीसाठी राळेगाव विधानसभेचे आमदार, माजी मंत्री अशोक उईके, राजापूरसाठी विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांची निवड जाहीर केली आहे तसेच कणकवली विधानसभेसाठी गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, कुडाळसाठी वर्ध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सावंतवाडीकरिता अनुसूचित जातीजमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com