शांततापूर्ण, सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत

शांततापूर्ण, सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत

१९ (पान २ साठी, मेन)

rat२८p६.jpg-
२४M८०३०५
रत्नागिरी : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची आढावा बैठक घेतली.
rat२८p७.jpg-
२४M८०३०६
रत्नागिरी : शासकीय गोदाम येथील मतमोजणी केंद्रात पाहणी करताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम.

मतदारांना आवश्यकत्या सुविधा द्या

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम ः मतदान टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न, प्रतीक्षा कक्षाची सूचना

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना शांततापूर्ण तसेच सुलभपणे मतदान करता यावे, त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चोक्कलिंगम यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सर्वसाधारण निरीक्षक राहूल यादव, खर्च निरीक्षक अंकुर गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.
चोक्कलिंगम म्हणाले, निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शी वातावरणात होण्यासाठी समन्वयाने काम करा. तीव्र ऊन असल्याने दक्षता घेऊन मतदारांना रांगेमध्ये उभे राहू लागू नये, यासाठी प्रतीक्षा कक्षाची सुविधा ठेवा. पावसाचा अंदाज घेऊन दक्षता घ्यावी. निवडणुकीत मद्य, पैसा याचा वापर टाळण्यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथकांना अधिक सक्रीय करा. वन खात्याचे तपासणी नाके सुरू करावेत. कायमस्वरुपी स्ट्रॉंग रुम, मतमोजणी केंद्र निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करावेत.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मतदार संख्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, बेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे वाटप, आदर्श आचारसंहिता कक्षाची कार्यवाही, खर्च विषयक तक्रारींचे निरसन, स्वीप आदींचा यात समावेश होता. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनीही संगणकीय सादरीकरण करुन, कारवाई, प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस बंदोबस्त, सुरक्षा आदींची सविस्तर माहिती दिली.
---------

प्रसंगी सॅटेलाईट फोन वापरा

चोक्कलिंगम यांनी मिरजोळे एमआयडीसी येथे असणाऱ्या शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्राला, कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनमधील इव्हीएम कमिशनिंग केंद्राला भेट दिली. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप वेळेत करा. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावरही विशेष भर द्यावा. प्रसंगी सॅटेलाईट फोनचा वापर करण्याच्या सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com