आंबवलीकरांनी दिला रक्तदानाचा संदेश

आंबवलीकरांनी दिला रक्तदानाचा संदेश

५ ( पान २ साठी )


- rat२८p४.jpg-
OP२४M८०३०४
नालासोपारा ः जीवनदान देणाऱ्या रक्तदान शिबिराचे रक्तदाते व आयोजन करणारे आंबवलीकर.

१३८ आंबवलीकरांनी केले रक्तदान

मंडणगड, ता.२८ ः तालुक्यातील आंबवली ग्रामस्थ मंडळ आणि अमर शक्ती क्रिकेट संघ यांनी संयुक्त विद्यमाने संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा येथील नूतन विद्यालय, नगिनदासपाडा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १४६ सभासदांनी नाव नोंदणी केली. त्यापैकी १३८ दात्यांनी रक्तदान केले.
उष्णतेची लाट, तयारीसाठी मिळालेला कमी कालावधी आणि ट्रेनचा जंबो मेगा ब्लॉक या मुख्य अडचणी असतानाही आंबवलीकरांचा उस्फुर्त सहभाग होता. मंडळाचे अध्यक्ष रवी रटाटे आणि माजी अध्यक्ष चंद्रकांत रटाटे यांचे मार्गदर्शन, कार्याध्यक्ष सुरेश खांबे यांची प्रभावशाली जनजागृती, सचिव जयदीप माळी यांनी नियोजन केले. मंडळाचे शिल्पकार गणपत रटाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. या शिबिराला मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला, नवतरुण, अमर शक्ती क्रिकेट संघाचे खेळाडू, विद्यार्थी उपस्थित होते.

---
कोट
बहुतेक सभासदांनी प्रथमच रक्तदान केले. हे सामाजिक कार्य असल्यामुळे त्याचा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. पुढील वर्षी पुन्हा रक्तदान शिबिराचे आयोजन करा.

- रवी रटाटे, अध्यक्ष.

------ बातमीदार - सचिन माळी...२८.४.२०२४----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com