ओटवणेचा प्रज्वल बनला ''अग्निवीर''

ओटवणेचा प्रज्वल बनला ''अग्निवीर''

swt2819.jpg
80401
प्रज्वल पनासे

ओटवणेचा प्रज्वल बनला ''अग्निवीर''
नौदलच्या ''एसएसआर''मध्ये निवड ः जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर गाठले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २८ ः जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर ओटवणे मांडवफातरवाडी येथील प्रज्वल पुनाजी पनासे (वय २०) या तरुणाची भारतीय नेव्हीतील नौदलाच्या अग्निवीर एसएसआर पथकात निवड झाली आहे. जिद्द आणि प्रयत्नाची जोड दिल्यास कोणतेही लक्ष गाठणे कठीण नाही त्याने दाखवून दिले आहे.
प्रज्वलचे प्राथमिक शिक्षण येथील रवळनाथ विद्यामंदिरमध्ये झाले. त्याने दहावी परीक्षेतही ९२.२० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला होता. त्यानंतर सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयातून विज्ञान विभागातून ६२ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. प्रज्वलचे लहानपणापासून भारतीय सैन्य दलात करिअर करून देशसेवा करण्याचे स्वप्न होते. त्यात प्रज्वलचा मोठा भाऊ प्रथमेश मर्चंट नेव्हीमध्ये मागील ८ वर्षे कार्यरत असून त्याचा आदर्श समोर ठेऊन भारतीय नौदलात देशसेवा करण्याच्या उद्देशाने सिग्मा करिअर अकॅडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर या अकॅडमीच्या तत्त्व व मार्गदर्शनानुसार तो भारतीय नौ दलाच्या भरतीमध्ये सहभागी झाला होता. मात्र, या पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात देशातील लाखो उमेदवारांमधून सर्वप्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, शारीरिक मोईजमाप, ऑनलाइन परीक्षा, मैदानी परीक्षा, मेडिकल चाचणी, कागदपत्र पडताळणी अशा विविध प्रकारच्या चाचण्यांमध्ये प्रज्ज्वलने विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याने त्याची भारतीय नौदलाच्या अग्निवीर एसएसआर पथकात निवड झाली. त्याच्या या निवडीमुळे आई-वडिलांसह पनासे कुटुंबियांच्या कष्टाचे चीज झाले असून प्रज्वल पनासे याचे ओटवणे परिसरातून अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com