Sindhudurg Temperature
Sindhudurg Temperatureesakal

Sindhudurg Heat Wave : उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्गवासीय घामाघूम; पारा 39 अंशांवर, जिल्ह्यात यलो अलर्ट

जिल्ह्यात सध्या लग्न समारंभ, साखरपुडा, वास्तुशांती असे विविध सार्वजनिक, घरगुती कार्यक्रम सुरू आहेत.
Summary

जिल्ह्यात आज ३९ अंश सेल्शिअस तापमानाची (Sindhudurg Temperature) नोंद झाली असली तरी ४६ अंश सेल्शिअस तापमानाच्या झळा नागरिकांना बसत असल्याचा भास होत होता.

वैभववाडी : उष्णतेच्या लाटेने (Heat Waves) आज सिंधुदुर्गवासीय घामाघूम झाले. उष्म्याने कहर केला असून, अंगाची लाही लाही करणारे वातावरण जिल्ह्याच्या सर्व भागात होते. तापमान जरी ३९ अंश सेल्शिअस असले तरी ४६ अंश सेल्शिअसच्या झळा जाणवत होत्या.

जिल्ह्याला आज उष्णतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने (Meteorology Department) दिला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, आज सकाळपासून उष्ण वारे वाहू लागले. दुपारी बारा वाजल्यानंतर उष्णतेच्या झळा अंगाला झोंबू लागल्या. उष्म्याने अक्षरक्षः कहर केला. जिल्ह्यात सर्वत्र अंगाची लाही लाही करणारे वातावरण होते. त्यामुळे सिंधुदुर्गवासीय अक्षरश: बेजार झाले.

Sindhudurg Temperature
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : ठाकरेंना हार घातलेले निम्मे नारायण राणेंच्या संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यात आज ३९ अंश सेल्शिअस तापमानाची (Sindhudurg Temperature) नोंद झाली असली तरी ४६ अंश सेल्शिअस तापमानाच्या झळा नागरिकांना बसत असल्याचा भास होत होता. आज सोमवार असल्याने काही भागात महावितरणने दुरुस्तीकरीता वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

जिल्ह्यात सध्या लग्न समारंभ, साखरपुडा, वास्तुशांती असे विविध सार्वजनिक, घरगुती कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमावर या उष्णतेच्या लाटेचा परिणाम होताना दिसत आहे. गर्दीत जाणे लोक टाळत आहेत. वाढलेल्या उष्णतेमुळे तरुण, मुलांची पावले स्विमिंग पूल, नदीतील डोहांकडे वळताना दिसत आहेत. वाढलेल्या तापमानाचा मोठा परिणाम आता आंबा पिकावर होत आहे. आंब्यामध्ये फळगळीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.

Sindhudurg Temperature
Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

राजकीय सभांनाही उष्म्याचा फटका

जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. गावागावांत राजकीय पदाधिकाऱ्यांची सभांचे नियोजन सुरू आहे. मात्र, वाढलेल्या तापमानवाढीमुळे नियोजित प्रचारामध्ये व्यत्यय येत आहे.

हवामान विभागाने आज उष्णतेच्या लाटेचा एक दिवसाचा यलो अलर्ट दिला होता. आज तापमान ३९ अंश सेल्शिअस होते. परंतु, उष्ण व दमट वातावरणामुळे उष्णतेच्या झळा अधिक जाणवत आहेत. उद्या (ता. ३०) पासून उष्णतेमध्ये काहीशी घट होत जाईल.

-डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com