...अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

...अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

80771
पेंडूर ः रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.


...अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

पेंडूरवासीयांचा इशारा ः रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी


सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः भूमिपूजन होऊनही पेंडूर येथील रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे काम लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करावे; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा पेंडूर-भटवाडी, मोगरणे ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पेंडूर सरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेली ३५ वर्षे दुर्लक्षित राहिलेला मालवण तालुक्यातील पेंडूर-भटवाडी-मोगरणे रस्त्याला अखेर मुख्यमंत्री सडक योजना टप्पा २ अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली. त्याची निविदाही निघाली आहे. या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ८ मार्चला मोठ्या उत्साहात करण्यात आला; मात्र आजतागायत या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. या कामासाठी नियुक्त झालेले कंत्राटदारांशी नागरिकांनी संपर्क साधला. यावेळी त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरुपात भरून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम करून दिले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे याही पावसाळ्यात नागरिकांना व वाहनचालकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, याबाबतचे निवेदन ब्राह्मणदेव युवा मंडळ भटवाडीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत खरारे-पेंडूरच्या सरपंच नेहा परब यांना दिले आहे. लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने योग्य दखल घेऊन निवडणुकीपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com