राजापूर-तरीही वाहनचालक शहाणे झालेले नाहीत

राजापूर-तरीही वाहनचालक शहाणे झालेले नाहीत

rat12p10.jpg-
83087
राजापूरः माहिती फलक असूनही वाहने नदीपात्रात उभी होती.
-----------
....तरीही वाहनचालक शहाणे झालेले नाहीत
राजापूर कोदवलीतील भरती ; माहिती फलकाकडे दुर्लक्ष
राजापूर, ता. १२ः : कोदवली-अर्जुना नदीला अचानक भरती आल्यामुळे खर्लीपात्रात पार्कींग करून ठेवलेल्या गाड्या दोन दिवसांपूर्वी पाण्यातच अडकून पडल्या होत्या. ही परिस्थिती तिसऱ्या दिवशीही कायम आहे. सुरक्षेसाठी नगर पालिकेने नदीपात्रात गाड्या पार्क करू नयेत असा फलक लावलेला आहेत. मात्र तरीही येथील वाहनचालक शहाणे झालेले नाहीत. रविवारीही काही गाड्या नदीपात्रात उभ्या करून ठेवल्याचे पहायला मिळाले.
समुद्राला उधाण येईल असा अंदाज मागील दोन दिवसांपूर्वी वर्तविलेला होता. त्याप्रमाणे भरतीवेळी अचानक नद्यांचे पाणी वाढले होते. त्यामुळे राजापूर कोदवली नदीचे खर्ली पात्र आणि अर्जुना नदी पात्रातील बंदर धक्का परिसर पुरता पाण्याने दोन दिवसांपूर्वी भरून गेला होता. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नेहमी कोरडे असलेल्या खर्ली नदीपात्राने पुराची आठवण करून दिली. भौगोलिक रचना विचित्र असल्यामुळे राजापूर शहरामध्ये गाड्यांच्या पार्कींगसाठी मोकळी जागा नाही. तसेच शहरामध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहन चालक कोदवली नदीतील मोकळ्या खर्ली पात्रामध्ये गाड्या उभ्या करून ठेवतात. त्याप्रमाणे अनेकांनी नेहमीप्रमाणे खर्ली नदीपात्रामध्ये गाड्या उभ्या करून ठेवलेल्या होत्या. त्या गाड्या अचानक आलेल्या भरतीमुळे पात्रात अडकून पडल्या होत्या. पाण्याने नदीपात्र भरून गेल्याने गाड्या बाहेर काढणे मुश्किल झाले होते. अडकून पडलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी संबधितांना आता भरतीचे पाणी ओसरून नदीपात्र मोकळे होण्याची प्रतिक्षा करावी लागली. रविवारीही भरतीचे पाणी आले होते. पहिल्यादिवसाप्रमाणे ते अधिक नसले तरीही पाण्यामध्ये गाड्या उभ्या करणे धोकादायक असतानाही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. वाहनचालकांनी सध्या गाड्या सुरक्षित ठिकाणी उभ्या कराव्यात असे आवाहन पालिकेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com