-गिलनेट मासेमारीला चालू चिंगळांचा आधार

-गिलनेट मासेमारीला चालू चिंगळांचा आधार

२ (पान ३ साठी)


- rat१३p१५.jpg-
24M83371
विक्रीसाठीची चिंगळं
------------

गिलनेट मासेमारीला चालू चिंगळांचा आधार

मतलई वाऱ्यांचा दिलासा ; किलोला १९० रुपये दर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः गेले चार दिवस कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्‍यांसह पावसाचे वातावरण आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरीही लावली; मात्र वेगवान वाऱ्‍याचा फायदा मच्छीमारांना झाला असून, गिलनेटने मासेमारी करणाऱ्‍यांना मतलई वारे फलदायी ठरले आहेत. सध्या चालू चिंगळं जाळ्यात सापडत असून, त्याला बाजारातही समाधानकारक दर मिळत आहे.
मोठ्या नौकांना अपेक्षित रिपोर्ट मिळत नसल्याने अनेक मच्छीमारांनी आवरतं घेण्यास सुरवात केली आहे. यंदाचा हंगाम बंद होण्यासाठी अजून वीस दिवसांचा कालावधी आहे. शेवटच्या टप्प्यात मिळणाऱ्‍या मासळीवर हंगामातील नफ्याचे गणित बांधण्याची तयारी मच्छीमार करत आहेत; पण त्यात यश आलेले नाही. ट्रॉलर्ससह फिशिंगच्या नौकांना मासेच मिळत नाहीत तर गिलनेटवाल्यांना चार दिवसांनी मासळीसाठी समुद्रात जावे लागत आहे. मागील आठ दिवसात वारे बदलल्यामुळे मासळी किनाऱ्याकडे वळू लागली आहे. गणपतीपुळे ते जयगडदरम्यान १५ ते २० वावात मच्छीमारांच्या जाळ्यात चालू चिंगळं सापडत आहे. ही मासळी खरंतर आठ दिवसांनी सापडू लागते; मात्र वाऱ्यांमुळे प्रवाह बदलल्याने खोल समुद्राकडील चिंगळं किनाऱ्‍याकडे आल्याचे मच्छीमारांनी सांगितले. दोन दिवसाआड गिलनेटवाले मासेमारीसाठी जात आहे. एका नौकेला सर्वसाधारणपणे ८० ते ९० किलो चालू चिंगळं मिळत आहेत. किलोला १९० रुपये दर मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यंदाच्या संपूर्ण हंगामात पाहिजे तेवढे मासे मिळालेले नाहीत. त्यामुळे हा हंगाम तुलनेत यथातथाच गेल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
---
कोट
गिलनेटने मासेमारी करणाऱ्या काही लोकांच्या जाळ्यात थोडीथोडी मासळी मिळत आहे. त्यावर चरितार्थ चालत आहे. किनारी भागात मासेच आलेले नसल्याने पाहिजे तसा व्यवसाय झालेला नाही. शेवटच्या टप्प्यात चालू चिंगळांचा आधार आहे; पण त्यामधूनही पाहिजे तेवढे उत्पन्न हाती येत नाही.
- अभय लाकडे, मच्छीमार
--------------
चौकट
हजार रुपयेच हाती

सध्या मिळणाऱ्‍या चालू चिंगळातून हजार रुपयेच मिळत असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. किलोला १९० रुपये मिळत असले तरीही होणारा खर्च जास्त होतो. ९० किलो मासळी मिळाली तर एका फेरीमधून १६ हजार रुपये मिळतात. त्यातील इंधनाचा खर्च १० हजार रुपये, आठ कामगारांचा मेहनताना ४ हजार रुपये, एक हजार रुपये हप्ता आणि फक्त एक हजार रुपये फायदा मिळतो, असे मच्छीमारांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com