रत्नागिरी अॅग्रोच्या दापोली शाखेचे उदघाटन

रत्नागिरी अॅग्रोच्या दापोली शाखेचे उदघाटन
Published on

रत्नागिरी अॅग्रोच्या
दापोली शाखेचे उद्‌घाटन
दाभोळ, ता. २१ : रत्नागिरी अॅग्रो या कंपनीच्या दापोली शाखेचे उद्‌घाटन दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांच्या हस्ते जालगाव येथील अपना स्वीट्स येथे करण्यात आले. कार्यक्रमाला जालगाव विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन चारुता कामतेकर, माजी चेअरमन अण्णा साबळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समीर फाटक, मराठी पत्रकार परिषद दापोलीचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, संगीतकार नीळकंठ गोखले, निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे उपस्थित होते.
निसर्ग संवर्धनामध्ये कार्य करणाऱ्या या संस्थेच्या दापोली शाखेच्या उद्‍घाटनाच्या निमित्ताने रत्नागिरी अॅग्रो, अमेय नर्सरी आणि निवेदिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मातृवृक्ष भेट योजना जाहीर केली आहे. या वृक्षप्रेमींना मातृवृक्षचे रोपटे पाहिजे असेल त्यांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. रत्नग्रीनच्या माध्यमातून एका वर्षात फक्त होम कंपोस्ट युनिटच्या माध्यमातून दहा टन कचऱ्याचे विघटन झाल्याची माहिती कंपनीचे सीईओ मनीष आपटे यांनी दिली. भारत स्वच्छता अभियानात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी रत्नग्रीन सदैव तत्पर असेल. याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी निवेदिता प्रतिष्ठानच्या संचालिका अस्मिता परांजपे, रमेश जोशी, दिनेश पटेल, नीलिमा परांजपे, वर्षा जोशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com