राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्यद स्पर्धा

राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्यद स्पर्धा

२९ (पान ५ साठी)
---------

- rat२९p२९.jpg-
२४M८६६०९
गुहागर ः राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्यद स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गुहागरात ‘बीच टार्गेट बॉल अजिंक्यद’ स्पर्धा

११ राज्यातील ३०० खेळाडूंचा सहभाग ; पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २९ : गुहागर समुद्रकिनारी आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्यपद स्पर्धेत ११ राज्यातील १२ संघ सहभागी झाले आहेत. राज्यभरातील ३०० खेळाडू कौशल्य दाखवणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा बीच टार्गेट बॉल असोसिएशन ऑफ सांगली (महाराष्ट्र) यांनी केले आहे.
बीच टार्गेट बॉल हा क्रीडाप्रकार नवीन असून, भारतात पाच वर्षे खेळला जात आहे. या खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा मागील वर्षी (२०२३) गोवा येथे झाली. गुहागरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब व मुंबई (स्वतंत्र संघ) या राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या उद‌्घाटनाला आंतरराष्ट्रीय बीच टार्गेट बॉल असोसिएशनचे सदस्य रवी सिंग, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र कदम, तेलंगणाचे बाबू नाईक, आंध्रप्रदेशचे रेवनाथ डी., कर्नाटकचे श्रीधर यांच्यासह गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर मोरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय स्पर्धेचे पंच म्हणून आर्यन पवार (उत्तर प्रदेश,) ख्रिस्तोपर (तमिळनाडू), मुरली (कर्नाटक) हे काम करत आहेत. पर्यटन हंगामात बीच टार्गेट बॉल स्पर्धा समुद्रकिनारी सुरू असल्यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी गुहागरवासियांबरोबरच पर्यटकांनी गर्दी केली होती. या प्रसंगी विनोद नलावडे म्हणाले, कोकणातील समुद्रकिनारी हा खेळ खेळला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच देशात या खेळासाठी वाळूची मैदाने तयार करण्याचे काम असोसिएनशतर्फे सुरू आहे.

-------
बॉल पास करण्याचे कौशल्य

समुद्रकिनारी वाळूत बास्केटबॉलप्रमाणे दोन संघात हा खेळ खेळला जातो. आपल्या संघाच्या खेळाडूंकडे बॉल पास करत तो छोट्या नेटमध्ये टाकून गोल करायचा असतो. वाळूत खेळताना दमछाक होते. त्यामुळे कमीत कमी धावून आपल्या सहकाऱ्यांकडे बॉल पास करण्याचे कौशल्य या खेळात पणाला लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com