गर्डरवर दुचाकी आढळून दुचाकीस्वराचा मृत्यू

गर्डरवर दुचाकी आढळून दुचाकीस्वराचा मृत्यू

गर्डरवर दुचाकी आदळून
खेरशेतच्या एकाचा मृत्यू
चिपळूणस ता. १० : मुंबई-गोवा महामार्गावरच्या खेरशेत येथील टोल नाक्यानजीक ठेवलेल्या गर्डरवर दुचाकी आदळून गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. महामार्गावर ठेवलेले धोकादायक गर्डरवर यापूर्वी देखील दुचाकीस्वार आदळल्याची घटना घडली आहे. अनिल रामचंद्र घाडगे (३०, खेरशेत-पुनर्वसन) असे मृत तरुणाचे नाव आहे. अनिल घाडगे हा शनिवारी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास आरवलीहून खेरशेत येथे घरी येत होता. मुंबई-गोवा महामार्गावरून दुचाकीने प्रवास करत असताना तो खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी आला. त्याठिकाणी महामार्गाच्या मोठे गर्डर ठेवले असून गर्डर ठिकाणी अंधार असल्याने याच गर्डरवर अनिल याची दुचाकी जोरदारपणे आदळली. या अपघातात अनिल याच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत झाली. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकाच्या हा अपघाताचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची कल्पना ग्रामस्थांना दिल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र गंभीररित्या जखमी झालेल्या अनिलचा यातच मृत्यू झाला. अनिल हा छोटी-मोठी कामे करून आपले घरकुटुंब चालवत होता. त्याच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील आहेत. शनिवारी खेरशेत येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच गर्डरवर आदळून एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. असे असताना पुन्हा एखादा याच गर्डरवर दुचाकी आदळून गंभीर अपघात झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com