वीज मीटर चुकीचा सांगून पैसे उकळणाऱ्याला चोप

वीज मीटर चुकीचा सांगून पैसे उकळणाऱ्याला चोप

Published on

वीज मीटरच्या नावाखाली
पैसे उकळणाऱ्याला चोप

माचाळमधील प्रकार ; पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ८ ः माचाळ येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा मीटर फॉल्टी आहे अशी बतावणी करून पैसे उकळणाऱ्या पर्यटकांना येथील ग्रामस्थांनी चोप दिला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली .
तालुक्यातील माचाळ थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षा पर्यटनासाठी समुद्रसपाटीपासून उंच असणाऱ्या माचाळला पर्यटकांची मोठी पसंती आहे. शुक्रवारी लांजातील तीनजण माचाळ येथे आले होते. येथील एका महिलेकडे या तिघांनी जेवणाची ऑर्डर दिली. दुपारी मौजमस्ती झाल्यानंतर जेवण झाले. त्यांच्याकडे जेवणाचे बिल मागितले त्यावेळी या पर्यटकांनी बिल देण्यास नकार दिला. या तीन पर्यटकांनी तुमचा मीटर फॉल्टी आहे, तुम्ही दुसऱ्याकडून वीज घेतली आहे असे सांगून तुम्हाला वीस हजार रुपये दंड असल्याचे सांगितले आणि संबधित महिलेकडून दोन हजार रुपये घेतले. याची माहिती माचाळमधील अन्य ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी मोटारीतून आलेल्या तिघांना ताब्यात घेतले आणि जाब विचारला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या तिघांना चांगला चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. येथील ग्रामस्थांनी माचाळ येथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या ओळखीचा पुरावा देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
---------------
शहरातून दुचाकीची चोरी

रत्नागिरी ः शहरातील नवकार प्लाझा येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता. ६) दुपारी नवकार प्लाझा-मारुती मंदिर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर जैनुद्दीन शेख (वय ४५, रा. शारदा मंदिर, मारुती मंदिर रत्नागिरी) यांनी दुचाकी शनिवारी मारुती मंदिर नवकार प्लाझा येथे समीर जेनरिक मेडिकल येथे पार्क केली होती. चोरट्याने ती पळविली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.