पेडणेत दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

पेडणेत दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

Published on

96037

पेडणेत दरड कोसळल्याने
मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ः मुंबई-गोवा महामार्गावर पेडणे (गोवा) घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला आहे. महामार्गाच्या दुतर्फा दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पेडणे शहरातून वळवण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात या घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे दरड कोसळण्याच्या घटना या सातत्याने होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्याने हा रस्ता आता पूर्णपणे सर्व वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तशा सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिल्या आहेत. यावर्षी नूतन महामार्गचे उद्घाटनही झाले. त्यानंतर लगेच या रस्त्याच्या बाजूला जी संरक्षण भिंत बांधली होती ती भिंत कोसळली. त्यानंतर पुन्हा एकदा दरड मागच्या चार दिवसांपूर्वी कोसळली होती. आज पहाटे दुसऱ्या बाजूची मोठ्या प्रमाणात असलेली दरड कोसळली. रस्ता वाहतुकीसाठी मागच्या दोन दिवसापूर्वी बंद ठेवल्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ही जुन्या मुंबई-गोवा महामार्गने पेडणे शहरातून वळवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.