सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला

Published on

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला
अधूनमधून सरीः नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. जिल्ह्यातील काही भागात आज दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत आहे. काही नागरिक अजूनही स्थलांतरीत असून मुसळधार पावसामुळे झालेल्या पडझडीच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू असून आतापर्यत कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात रविवारपासून (ता. ७) मुसळधार पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली होती. सावंतवाडी, बांदा, कुडाळ या बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी शिरुन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्याचा पावसाने झोडपले होते. काल (ता.९) पर्यंत किनारपट्टी भागातही जोर कायम होता. त्यामुळे पूरस्थिती कायम होती. ओरोस-ख्रिश्चनवाडीमध्ये एकूण तीन कोटी ४१ लाख ५ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे प्रशासनाकडून आज पूर्ण करण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर पेडणे मालपे (गोवा) बोगद्यामध्ये भूगर्भातून पाणी येऊ लागल्याने रेल्वे रुळावर चिखल आणि पाणी साचल्याने रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले.
दरम्यान, आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे बऱ्याच भागातील जनजीवन पुर्वपदावर येत आहे. जिल्ह्यातील काही भागात आज दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.